महिला दिन शुभेच्छा संदेश | mahila din shubhechha in marathi
mahila din shubhechha in marathi |
👩 दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात आयोजित केला जातो. जेणेकरुन आपण जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करू शकू. त्या साठी आपण आपल्या मैत्रीणीना शुभेच्छा संदेश पाठवुन आपण हा दिवस साजरा करू शकतो.
👩 स्त्री म्हणजे जन्मदाती,
स्त्री म्हणजे संस्कृती,
स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा,
स्त्री म्हणजे घराच घरपण,
स्त्री म्हणजे महान कार्य,
अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा.
👩 जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा, तो एकटाच सुशिक्षित होतो. मात्र जेव्हा एखादी महिला शिकते, तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते.
👩 तिला भिती वाटत नाही, म्हणून ती खंबीर नाही. तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे.
👩 विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू .एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू.. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
👩 पूर्वजन्माची पुण्याई असावी, जन्म तो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी, नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.
👩 प्रेम म्हणजे काय हे फक्त महिलाच जाणू शकतात.
👩 तू आदिशक्ती, तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
👩 ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. जागतिक दिनाच्या शुभेच्छा.
👩 स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक दिनाच्या शुभेच्छा.
👩 जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या प्रिय सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा.
👩 ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा, म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
👩 स्त्रियांना चढूद्या, शिक्षणाची पायरी, शिकून सावरतील दुनिया सारी.
👩 स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कर्तुत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक दिनाच्या शुभेच्छा.
👩 आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू…
👩 तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे.
👩 महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
👩 आज जागतिक महिला दिनानिमित्त
सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,
विविध पातळीवर यशाची
उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या
कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा…
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
👩 स्त्रीयांचा अपमान म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि सरस्वतीदेवीचा अपमान आहे.
👩 आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.
👩 नारी हीच शक्ती आहे नराची…
नारी हीच शोभा आहे घराची…
तिला द्या आदर, प्रेम, माया…
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा…
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
👩 स्त्री म्हणजे एक सुंदर कविता आहे.
👩 ज्याला स्त्री आई म्हणून कळली, तो जिजाऊंचा शिवबा झाला..
आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला..
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा शाम झाला..
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला..
👩 प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे…
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !
👩 तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्मांचा कृतज्ञ मी. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई.
👩 जी कोणतेही वेतन न मागता आपल्या परिवाराचा तसेच कुटुंबाचे व्यस्थित रित्या संगोपन चालू ठेवते, तेही कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या सर्व महिलांना माझी मराठी चा मानाचा मुजरा.
👩 इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तुडवला !
लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला !
जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला !
महराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला !
👩 स्त्रियांना चढूद्या, शिक्षणाची पायरी, शिकून सावरतील दुनिया सारी.
👩 ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…
0 Comments