Subscribe Us

गुढीपाडवा माहिती मराठी 2022 | gudi padwa 2022 marathi mahiti

 गुढीपाडवा माहिती मराठी 2022 | gudi padwa 2022 marathi mahiti

गुढीपाडवा माहिती मराठी 2022
गुढीपाडवा माहिती मराठी 2022

गुढी पाडव्याचा अर्थ 

गुढी पाडवा हा दोन शब्दांनी बनलेला आहे. ज्यात गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा. या दिवशी गुढी बनवून फडकवली जाते आणि त्याची पूजा केली जाते.

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ही प्रथा महाराष्ट्र आणि त्याच्याशी संबंधित काही राज्यांमध्ये साजरी केली जाते. याशिवाय घराच्या दारावर आंब्याच्या पानांनी बनवलेले तोरण सजवले जाते. असे मानले जाते की हे तोरण घरात सुख, समृद्धी आणि आनंद आणते.

भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते.

गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवशी साजरा केला जातो. यंदा पाडवा 2 एप्रिल 2022 दिवशी आहे. गुढी पाडव्याला महाराष्ट्रात शोभा यात्रा काढून मराठी रूढी-परंपरा यांचा वसा पुढील पिढीला देण्याची रीत आहे. गुढी पाडव्याला मराठी नववर्ष सुरू होत असल्याने घराघरांमध्ये गुढी उभारली जाते. ही प्रतिकात्मक गुढी आनंदाचे, सुखाचे, सकारात्मकतेचे प्रतिक म्हणून पुजले जाते आणि नव्या वर्षाची सुरूवात केली जाते.

यंदा शनिवारी गुढीपाडवा साजरा होत असून,नव वर्षाचा स्वामी शनी देव राहील. यादिवशी समृद्धीयोग तसेच रेवती नक्षत्र आहे. या दिवसापासून २०७९ नल संवत्सर आणि श्री शालीवाहन शके १९४४ प्रारंभ होईल. सांगितले जात आहे की, २७ नक्षत्रांच्यापासून २७ लहरी निर्माण होत असतात. त्या २७ लहरींच्यापैकी प्रजापति लहरी, यमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. याप्रमाणे प्रजापति, यम व सूर्य या तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते

वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.

गुढीपाडव्याचे महत्व

गुढीपाडवा हा सण विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारावर उंच बांबूच्यासाह्य्याने गुढी उभारतात. गुढीला रेशमी वस्त्र, साडी गुढाळली जाते. यासोबतच कडूनिंबाची डहाळी, फुलांचा हार आणि खडीसाखर किंवा गाढ्या बांधून त्यावर उलटा तांब्या ठेवतात. गुढी उभारल्यानंतर तिची पूजा केली जाते. आणि पंचपक्वांनांचा नैव्यद्य दाखवला जातो. संध्याकाळी हळद-कुंकू लावून गुढी उतरवली जाते. गुढी हे आनंदाचे, सुखाचे, समृद्धीचे आणि विजयाचे प्रतिक मानले जाते.

गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे अनेक श्रद्धा आहेत. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते आणि त्याच्या स्मरणार्थ गुढीपाडवा साजरा केला जातो अशी एक धार्मिक श्रद्धा आहे. तर या दिवशी ब्रह्म देवाने विश्वाची निर्मिती केली होती अशी देखील अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते. आणखी एका प्रथेनुसार पेरणी झाल्यावर रब्बी पीक काढल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी चांगले पीक यावे या उद्देशाने शेतकरी शेतात नांगरणी करतात अशी देखील मान्यता आहे. 

या दिवशी अशा अनेक घटना घडल्या ज्या हिंदूंच्या श्रद्धांना खूप योगदान देतात. हा सण साजरा करण्याची काही कारणे 👇👇

1. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. हा मुहूर्त कोणतीही नवीन गोष्ट प्रारंभ करण्यासाठी,

नवीन वस्तू घेण्यासाठी उत्तम समजला जातो.

2. ब्रह्मपुराणानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेला या दिवशी विश्वाची निर्मिती सुरू झाली. म्हणूनच ही तारीख सर्वोत्तम मानली जाते.

3. साडेतीन मुहूर्तपैकी एक मुहूर्त, अतिशय शुभ दिवस, मराठी नूतन वर्ष प्रारंभ, वसंत ऋतुचे आगमन

4. हिंदू दिनदर्शिका विक्रम सावंत गुढीपाडव्यापासून सुरू होते. महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी या दिवसापासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस, महिना आणि वर्ष मोजून विक्रम सावंत यांची रचना केली. त्या वेळी केलेली गणना आजच्या काळाच्या गणनेत पूर्णपणे बसते.

5. गुढीपाडव्याबद्दल आणखी एक श्रद्धा अशी आहे की या दिवशी भगवान श्री राम यांनी दक्षिणच्या लोकांना बालीच्या अत्याचारातून मुक्त केले. 

6. महर्षी दयानंद यांनी आर्य समाजाचा स्थापना केली.

7. गुढीपाडव्यालाच शिखांचे दुसरे गुरू गुरु अंगद देवजी यांचा जन्म पंजाबच्या फिरोजपूरमधील हरीके नावाच्या गावात झाला.

8. गुढी पाडव्याच्या दिवशी सिंध प्रांतातील प्रसिद्ध समाज रक्षक वरुणावतार संत झुलेलाल यांचा प्रकट दिवस झाला.

9. भगवान श्री रामाचा राज्याभिषेक या दिवशी झाला.

10. या दिवशी उज्जैनीच्या सम्राट विक्रमादित्यने शकांचा पराभव करून विक्रम संवत् सुरू केले.

11. भगवान विष्णूंनी या दिवशी मत्स्य अवतार घेतला. 

12. युधिष्ठिर या दिवशी सिंहासनावर बसला.

13. या दिवसापासून नवरात्रोत्सव, मा दुर्गाची पूजा उत्सव सुरू होतो.

14. या दिवसापासून दिवस रात्रीपेक्षा लांब होऊ लागतो.



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.







Post a Comment

0 Comments