babasaheb bhashan marathi | बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी मधे
![]() |
babasaheb bhashan |
babasaheb bhashan marathi
बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी मधे
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, माझ्या शाळेतील शिक्षक वर्ग आणि माझे वर्ग मित्र. मी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर थोडक्यात भाषण देत आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे, ही नम्र विनंती आहे.
तर मित्रांनो त्या काळात एक वेळचे खायला अन्न मिळत नव्हते अश्यावेळी सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या वंशामध्ये १४ एप्रिल १८९१ ला.मध्य प्रदेशच्या महू या गावात भिमराव जन्माला आले. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते . जेव्हा ते शाळेत जाऊ लागले होते. तेव्हा त्या शाळेतील विद्यार्थी दुरदुर बसायचे कारण बाबासाहेब हे महार जातीचे होते अगोदर महार ह्या जातीला शुद्र समजले जात होते. भिमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्विकारावी लागली. पण ते मुळीच खचले नाहीत, त्यांनी अस्पृश्य दीन दलितांचा उध्दार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले.
त्यांच्या अंगाला चुकून हात लागला तर ते आंघोळ करायचे. पण बाबासाहेबांनी ते निमुटपणे सहन केले. ब्राम्हण शिक्षक सुद्धा त्यांना शाळेत बसू देत नव्हते एकदा यांनी शाळेच्या खिडकी जवळून मास्तर काय शिकवित हे बघून अभ्यास केला. त्यांनी आपल्या वडीलांना विचारले. आपल्या घरी रामायण ग्रंथ आहे. महाराभारत आहे तुम्ही ते वाचत राहता मग हे लोक विटाळ का मानतात ? रामजीना प्रश्न पडला की पोराला कसं समजावावे ? भिमराव आता हुशार झाला होता. मित्रांनो एवढा मोठा अपमान त्यांनी सहन केला.
बाबासाहेब इ चौथीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले भगवान बुद्धाचे चारित्र्य हे पुस्तक वाचण्यास दिले, पुस्तक वाचून भीमराव खूप प्रेरित झाले.
डॉ बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीररीत्या दहन केले. नाशिकमधील काळाराम मंदिरामधे दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. समाजाने धिक्कारलेल्या समाजासाठी ते आशेचा किरण ठरले. मुकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत है साप्ताहिक तर समता हे वृत्तपन्न सुरू करून त्यांनी समाजप्रबोधनाचे बहूमल्य कार्य केले. स्त्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला.
रमाबाई ह्या गरीब घराण्यातल्या होत्या. त्यांनी बाबा साहेबांच्या खांद्याला खांदा देवून त्यांच्या शिक्षणात मदत केली. रमाबाईंनी सोन्याचांदीची कधी आशा केली नाही. कपाळाचं कुंकू हेच ती आपला दागिना समजत असे. मित्रांनो आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षणाच्या पदव्या त्यांनीच घेतल्या आहेत. वकिल बनून गरीबांना न्याय मिळवून दिला.
समाजाच्या कल्याणाकरिता त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला नाही शुद्रांना महाडच्या चवदार तळयाचे पाणी पिण्याची मनाई होती. परंतु बाबासाहेबानी आंदोलन करुन सर्वांकरीता ते खुले केले. भारताची न्याय व्यवस्था अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणन त्यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस मेहनत घवून राज्यघटना, भारतीय संविधानाची निर्मिती केली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मोलाचा महामंत्र त्यांनी दिला. त्यांचे आम्ही सर्व समाज बांधव फार फार ऋणी आहोत..
मित्रांनो बाबासाहेबांनी अशी प्रतिज्ञा केली की, जरी मी हिन्द धर्मात जन्म घेतला, तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही म्हणून त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ मध्ये येवले येथे धर्मांतराची घोषणा केली.व इ.स. १९५६ च्या १४ ऑक्टोबर ला नागपूरच्या दिक्षा भमिवर लाखो लोकांच्या उपस्थितीत बौध्द धर्माची दिक्षा ग्रहण केली.
बाबासाहेबांच्या जीवनावर असे अनेक प्रसंग आहेत की आपण दिवस रात्र बोललो तरी संपणार नाहीत. काही दिवसांत त्यांची प्रकृति बिघडली व दिल्ली मध्ये ६ डिसेंबर १९५६ साली बाबासाहेब आम्हाला कायमचे सोडून गेले. त्यांच्या या बातमीमुळे सारे जग रडले. त्यांचे पार्थिव शरीर विशेष विमानाने मुंबईच्या दादर चौपाटीवर आणण्यात आले व अंतिम संस्कार बौद्ध रितीरिजानुसार करण्यात आले. तेव्हापासून त्या भूमिला चैत्यभूमि असे नाव देण्यात आले.
मित्रांनो ह्या महामानवाच्या अंत्य यात्रेमध्ये दहा ते बारा लाख नागरिक शामील झाले होते व त्याची रांग लांबच लांब म्हणजे तीन मैलांची होती असे इतिहासात नमूद आहे.
तर आता मी जास्त न बोलता आपले भाषण संपवतो जय हिंद, जय भारत, जय भिम.
0 Comments