Subscribe Us

बसवेश्वर जयंती 2022 | Basava Jayanti date 2022

बसवेश्वर जयंती 2022 | Basava Jayanti date 2022

बसवेश्वर जयंती 2022 | Basava Jayanti date 2022
बसवेश्वर जयंती 2022 | Basava Jayanti date 2022

💢 बसवेश्वर जयंती 2022 :-

तत्कालीन मंगळवेढा राज्यावर कलचुर्य राजा बिज्जल राज्य करीत होता. त्याच्या मंगळवेढा राज्यातील बागेवाडी या छोट्या गावात 1105, वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय्य तृतीया दिवशी महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला.

 लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर  यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती (Basweshwar Jayanti) म्हणून साजरा केला जातो. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्यामुळे त्याचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात. यावर्षी बसवेश्वर जयंती 3 मे रोजी म्हणजेच उद्या आहे.

बसवेश्र्वरांनी स्वतःचा उपनयन-संस्कार करून घ्यायचे नाकारले, यावरून बालपणापासूनच त्यांचा भावहीन कर्मकांडाला विरोध असल्याचे दिसून येते. भव्य मंदिरे बांधण्यावर खर्च करू नये, तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही यांसारख्या मतांवरूनही त्यांनी कृत्रिम कर्मकांडाला विरोध केल्याचे स्पष्ट होते. लिंगायत लोक बसवेश्र्वरांना शिववाहन नंदीचा अवतार मानतात.

अग्रजापासून अंत्यजापर्यंत सर्वजण बसवण्णांच्या शरण चळवळीत सामील झाले. त्या चळवळीत झालेल्या सहभागी पुरुषांना आणि स्त्रियांना अनुक्रमे शरण-शरणी अशी नावे मिळाली. शरण चळवळीचे रूपांतर पुढे स्वतंत्र लिंगायत धर्मामध्ये झाले. लिंगायत धर्माची धर्मांतही झालेल्या शरणांची पूर्वाश्रमीची जात नष्ट झाली. अग्रज-अंत्यज यांच्यात रोजी बेटी व्यवहार सुरू झाले जातीच्या भिंती तुटून पडल्या बसवाच्या शरणचळवळरूपी झाडाला समता, समानता, बंधुता, विवेक, कायक, दासोह याची फळे आली. समाजाच्या प्रत्येक थरातून स्त्री-पुरुष बसवण्णांच्या लिंगायत चळवळीत सामील झाले, ते शरण झाले. शरण म्हणजे शरण परिवारात राहणारा, वचनांवर विश्वास ठेवणारा, नित्य, सत्य-शुद्घ दासोह करणारा, चर्चा-अनुभाव-अनुभव करणारा, लिंग-जाती इ. भेद न मानणारा, मुक्त व्यक्ती म्हणजे शरणी-शरण पण हीच व्याख्या २१ व्या शतकाला अनुसरुन करावी लागेल, ती अशी होईल- निजमुक्त, निर्मोही, जाती-लिंग-वर्ण-वर्ग इ. भेद विरहित.

समाजातील प्रत्येक घटकाने सदाचाराने आचरण करावे. नितिनियमांचे पालन करावे. अनाचार करू नये. चोरी, क्रोध, राग, स्तुती, मत्सर, आत्मस्तुती करू नये असे बसवण्णा एका वचनात सांगतात. बसवण्णा म्हणतात, "चोरी करू नको, हत्या करू नको, खोटे बोलू नको, रागावू नको, इतरांचा तिरस्कार करू नको, दुसऱ्याची निंदा करू नको, हीच अंतरंगशुद्धी, हीच बहिरंगशुद्धी, हेच कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीत आहे.

वाचा - बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी - 1

वाचा - बाबासाहेब आंबेडकर प्रश्न मंजूषा


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

Post a Comment

0 Comments