वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी ई मेल आय. डी दुरुस्तीबाबत अपडेट
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
(SCERT,पुणे)राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली होती .
सदर यादी खालील लिंकवर पहायला मिळेल.👇👇
https://training.scertmaha.ac.in/
💢💢 कृपया आपला ई मेल आय. डी तपासावा. आपला इमेल आय. डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपला ई मेल आय.डी चुकला असल्यास तो पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी.👇👇
https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist1.aspx
या वेबसाईटवर पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
💢💢 मात्र नोंदणी केलेल्या काही शिक्षकांचे Email -ID मध्ये काही चुका असल्याने अथवा काही प्रशिक्षणार्थींचे एकच ईमेल आय.डी एका पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आल्यामुळे महत्वाचे मॅसेज प्राप्त होणार नाहीत. कारण प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.
दुबार ईमेल यादी या टॅब वर क्लीक केल्यास एका पेक्षा जास्त वेळा ई-मेल ID वापरण्यात आल्यामुळे महत्वाचे मॅसेज प्राप्त होणार नाहीत. यासाठी ई-मेल ID मध्ये बदल करून घ्यावा. त्यासाठी खालील लिंकवर टच करा.👇
0 Comments