Subscribe Us

शाळा प्रवेश वय शासन निर्णय 2022 | ZPPS TECH GURUJI

शाळा प्रवेश वय शासन निर्णय 2022 | ZPPS TECH GURUJI

शाळा प्रवेश वय शासन निर्णय 2022
शाळा प्रवेश वय शासन निर्णय 2022


प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.

२. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका,

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व.

४. प्रशासन अधिकारी (नपा/मनपा) सर्व.

विषय:- सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.

संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांक:- आरटीई-२०१८/प्र.क्र.१८० / एस.डी.-१, दिनांक १८/०९/२०२०. 

              २. शासन निर्णय क्रमक:- आरटीई २०१९/प्र.क्र.११९ / एस.डी.-१ दिनांक २५/०७/२०१९

उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहे. म्हणून मानिव दिनांक बदलामुळे य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.👇


प्रवेशाचा वर्ग

किमान वय

कमाल वयोमर्यादा

नर्सरी / प्ले ग्रुप

3 वर्षे

1 Octomber 2018 ते 31 डिसेंबर 2019

जुनियर केजी

4 वर्षे

1 Octomber 2017 ते 31 डिसेंबर 2018

सिनियर केजी

5 वर्षे

1 Octomber 2016 ते 31 डिसेंबर 2017

इयत्ता पहिली

6 वर्षे

1 Octomber 2015 ते 31 डिसेंबर 2016










पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे. शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही.

आरटीई २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन पोर्टलवर वयोमर्यादा निश्चित केल्यानंतर आपणांस यथावकाश कळविण्यात येईल. त्यामुळे वयोमर्यादेबाबत सर्व शाळांना आपल्यास्तरावरुन कळविण्यात यावे जेणेकरुन या कार्यालयाकडे वयोमर्यादेबाबतच्या कोणत्याही तक्रारी येणार नाहीत.


(दिनकर टेमकर)

शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे १.

प्रत माहीतीस्तव सविनय सादर :👇

१) मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२. 

२) मा. आयुक्त (शिक्षण) म. रा. पुणे.

RTE 25% शाळा प्रवेश वय शासन निर्णय 2022 

❇️ शाळा प्रवेशासाठी जन्मदिनांक व वयाबाबतचे परिपत्रक 2022-23 डाउनलोड करा.👇

शाळा/शिक्षक/मुख्याध्यापक उपयोगी विविध नमुना PDF व Excel फाईल्स डाऊनलोड करा


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

Post a Comment

0 Comments