asadharan raja niyam 63 | असाधारण रजा नियम ६३
![]() |
asadharan raja niyam 63 | असाधारण रजा नियम ६३ |
asadharan raja niyam 63, असाधारण रजा नियम ६३ :-
१) कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल किंवा इतर रजा अनुज्ञेय असताना देखील स्पष्टपणे असाधारण रजेची मागणी केली असेल तरच ही रजा मंजूर करता येते.
२) रजा वेतन :- या रजेमध्ये वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय नाही पण रजेवर जाण्यापुर्वी ज्या दराने घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ता दिला जात होता तो मात्र घरभाडयावर त्या मुख्यालयात कर्मचारी खर्च करतोय असे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे. शा. नि. दि. ४ /९/२०००. सदर याबाबतची खात्री सक्षम अधिकाऱ्याने करणे गरजेचे असून त्यांचे समाधान झाल्यावरच सदर फायदा देता येईल.
३) अस्थाई कर्मचाऱ्यांना ही रजा खालील मर्यादेपर्यंत मंजूर करता येते :
४) कोणताही कर्मचारी - वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय - ३ महिन्यांपर्यंत.
५) १ वर्षाच्या सेवेनंतर - वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे - ६ महिन्यांपर्यंत.
६) ५ वर्षाच्या सेवेनंतर - वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे - १२ महिन्यांपर्यंत.
(७) १ वर्षाच्या सेवेनंतर - कर्करोग, मानसिक रोग यासाठी - १२ महिन्यांपर्यंत.
८) १ वर्षाच्या सेवेनंतर - क्षयरोग, कुष्ठरोग यासाठी - १८ महिन्यांपर्यंत.
९) ३ वर्षाची सेवेनंतर - लोकहितार्थ उच्च अभ्यासक्रमासाठी - २४ महिन
१०) कायम सेवेतील कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारची रजा ५ वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मंजूर करता येत नाही.
0 Comments