Subscribe Us

संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत

संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत

संपात सहभागी झालेल्याकर्मचार्‍यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत

संपात सहभागी झालेल्याकर्मचार्‍यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत
राज्य शासनाने आपल्या सात दिवसाच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ते सात दिवस असाधारण रजा म्हणून मंजूर करण्याचा शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे.

असाधारण रजा म्हणजे काय हे समजावून घेणे गरजेचे आहे.👇

असाधारण रजा:-

_(नियम क्रमांक 63 व 70(4)) एखाद्या कर्मचा-यास विशेष परिस्थितीमध्ये व अन्य कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तेव्हा असाधारण रजा मंजूर करता येते किंवा इतर रजा अनुज्ञेय असतानाही कर्मचा-याने तशी विनंती केल्यास ही रजा मंजूर करता येते._

नियमानुसार असाधारण रजेच्या कालावधीत वेतन मिळत नाही. फक्त घरभाडे भत्ता दिला जातो.

संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.....

 दिनांक २८ मार्च २०२३

प्रस्तावना :-

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचान्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक १४ मार्च, २०२३ पासून राज्यव्यापी "बेमुदत संप" आंदोलनासंदर्भाबाबत शासनास नोटीस दिली होती. सदर संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होवू नये असे आवाहन संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये करण्यात आले होते. तरीही संपामध्ये काही कर्मचारी / अधिकारी सहभागी झाले. मा. मुख्यमंत्री मा. उपमुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर दिनांक २०.३.२०२३ रोजी बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आला. या संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते त्यांची अनुपस्थिती नियमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती...

शासन निर्णय :-

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र त्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक १४ मार्च २०२३ ते दिनांक २० मार्च, २०२३ या कालावधीत संपामध्ये जे शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते, त्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता "असाधारण रजा" म्हणून नियमित करण्यात यावी. तथापि, सदर असाधारण रजेचा कालावधी शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे १००१/२९/सेवा-४, दिनांक १४.०१.२००१ च्या आदेशास अपवाद करुन सेवेतील खंड न समजता निवृत्तीवेतनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा 

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२३०३२८१८३६५९९२०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे..

 महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने 

(सं. द. सूर्यवंशी)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

 शासन निर्णय पहा.👇👇


वाचा ➡️ सर्व प्रकारच्या रजा नियम

वाचा ➡️ असाधारण रजा नियम

वाचा : जवाहर नवोदय विद्यालय | शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा उपयोगी Online Test


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html


🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇





































Post a Comment

0 Comments