chandobachya deshat | चांदोबाच्या देशात कविता
chandobachya deshat, चांदोबाच्या देशात कविता
❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇
झाडावर चढू,
आकाशात उडू.
ढगांच्या गादीवर,
धपकन पडू.
मऊमऊ ढगांवर,
घडीभर लोळू.
चमचम चांदण्यांशी,
लपाछपी खेळू.
पळणाऱ्या चांदोबाच्या,
मागे मागे धावू.
चांदण्यांच्या पंगतीला,
पोटभर जेवू.
चांदोबाशी गोडीनं,
खूप-खूप बोलू.
घरातल्या गमती,
सांगत चालू.
चालून चालून,
दुखतील पाय.
चांदोबा बोलेल मला,
'दमलास काय ?'
'बस माझ्या पाठीवर,
फिरायला जाऊ.
आकाशगंगा जरा,
जवळून पाहू.'
चांदोबाच्या पाठीवर,
पटकन बसू.
आकाशात फिरताना,
ताऱ्यांसारखं हसू.
- एकनाथ आव्हाड
💥 कवितेचा विडियो पाहा. 👇
पहा - dusri kavita | दुसरीची कविता
पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी
पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी
पहा -पाचवीच्या कविता मराठी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments