Subscribe Us

chulivarchi kheer | चुलीवरची खीर एकदा पुरीला

chulivarchi kheer | चुलीवरची खीर एकदा पुरीला


चुलीवरची खीर एकदा पुरीला
चुलीवरची खीर एकदा पुरीला


chulivarchi kheer, चुलीवरची खीर एकदा पुरीला


❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇

चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली 

कढईतली पुरी मग गुरफटून बसली 

काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना 

झाऱ्यानं टोचलं, ते ही तिला बोचलं 

अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली

पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल 

मन आले भरू, डोळे लागले झरू 

तिथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली

खीर थंड झाली वाटीत बसून आली 

लाडे लाडे खीर मग पुरीजवळ गेली 

'पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे 

माझे म्हणणे ऐक गडे'... पण अं हं... 

चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली

तिकडून ताई आली, तिने युक्ती केली 

खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली 

तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली 

कढईतील पुरी मग कध्धी नाही रुसली

                            - निर्मला देशपांडे


💥 कवितेचा विडियो पाहा. 👇 




🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇






Post a Comment

0 Comments