Subscribe Us

nakhwa dada nakhwa dada | नाखवादादा नाखवादादा

nakhwa dada nakhwa dada | नाखवादादा नाखवादादा 


nakhwa dada nakhwa dada | नाखवादादा नाखवादादा
nakhwa dada nakhwa dada | नाखवादादा नाखवादादा 

nakhwa dada nakhwa dada | नाखवादादा नाखवादादा 

❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇

नाखवादादा नाखवादादा, 

'खाडीपल्याड न्याल काय ?' 

'खाडीपल्याड या वेळी, 

सोन्या तुझे काम काय ?' ।। १ ।।

खाडीपल्याड उंच डोंगर, 

डोंगरावर हिरवे रान, 

सकाळच्या कोवळ्या उनात, 

दिसेल किती छान छान ! ।। २ ।।

हिरव्या रानी शुभ्र ससे, 

सशांचे डोळे लाल लाल. 

त्यांना पाहून रागाने, 

गुंजा आपले फुगवतील गाल. ।। ३ ।

फुलाफुलांत फुलपाखरे, 

फुलपाखरांचे सोनेरी रंग. 

उनात त्यांच्यासंगे न्हाती, 

पक्षी आपले फुलवून अंग. ।। ४ ।।

पानापानांत दवबिंदू, 

दवबिंदूंचे हिरे लाख. 

कोवळ्या उनात झगमगती, 

आभाळाचे निळे पाख. ।। ५ ।।

आभाळात रंगीत ढग, 

ढगांमागे इंद्रकमान. 

कमानीवर घेऊन झोके, 

पाहयची आहे खाडीची शान. ।। ६ ।। 

नाखवादादा, नाखवादादा,

'खाडीपल्याड न्याल काय ?'

‘सोनसळ्या कवडशा,

न नेऊन चालेल काय ?' ।। ७ ।।

नाखवादादा, नाखवादादा, 

खाडीपल्याड नेण्यासाठी काय घ्याल ? 

काही नको सोन्या मला, 

पापीसाठी गुबरे गाल ! ॥ ८ ॥

              --वसुधा पाटील

💥 कवितेचा विडियो पाहा. 👇 


पहा -  dusri kavita | दुसरीची कविता

पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी 

पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी 

पहा -पाचवीच्या कविता मराठी


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇








Post a Comment

0 Comments