झुळूक मी व्हावे मराठी कविता | ZPPS TECH GURUJI
झुळूक मी व्हावे मराठी कविता | ZPPS TECH GURUJI
❇️ऐका. म्हणा. वाचा.👇
वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे,
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे.
कधि बाजारी तर कधी नदीच्या काठी,
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी.
हळु थबकत जावे कधि कानोसा घेत,
कधि रमत गमत वा कधी भरारी थेट...
लावून अंगुली कलिकेला हळुवार,
ती फुलुनि बघे तो व्हावे पार पसार..
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा,
तो दिशादिशांतुनि फिरता उधळुनि दयावा.
गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर,
झुळझूळ झऱ्याची पसरावी चौफेर.
शेतांत पाचुच्या, निळ्या नदीवर शांत,
खुलवीत मखमली तरंग जावे गात.
- दा. अ. कारे
💥 कवितेचा विडियो पाहा. 👇
पहा - dusri kavita | दुसरीची कविता
पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी
पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी
पहा -पाचवीच्या कविता मराठी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments