शाळेतील उपक्रम | शालेय नवोपक्रम यादी
शाळेतील उपक्रम, शालेय नवोपक्रम यादी
- शालेय विषयांवर आधारित नवोपक्रम तयार करणे.
- प्रश्नपत्रिकांची पेढी तयार करणे.
- आकाशवाणीवरून प्रसारित होणारे शालेय कार्यक्रम विद्यार्थ्यांना नियमितपणे ऐकवणे.
- आदर्श उत्तरपत्रिकांची पेढी बनवणे.
- लेखनसराव वर्ग चालवणे.
- विविध विषयांवर पॉवर पॉईंट सादरीकरण तयार करणे.
- पालकांचे कामकाजात सहकार्य घेणे.
- ध्वनिफितींचे संकलन करणे व मोबाईलच्या साहाय्याने त्यांचा वापर वर्गात करणे..
- दैनिक वर्तमानपत्रांमधून येणारे दहावीच्या अभ्यासासंबंधीचे लेख अभ्यासणे.
- क्रमान्वित अध्ययन पद्धतीचा वापर करणे.
- प्रज्ञावान मुलांसाठी खास वर्ग घेणे.
- अभ्यासात मागे असलेल्यांसाठी खास वर्ग घेणे.
- रविवार अभ्यासिका चालवणे.
- शाळेतील एखादया समस्येवर कृतिसंशोधन प्रकल्प करणे.
- दीर्घ सुट्टीतील अभ्यासिका चालवणे.
- गृहपाठांचे संयोजन करणे.
- तक्तेनिर्मिती करून त्यांचा वापर करणे.
- नावीन्यपूर्ण अध्यापन साहित्यनिर्मिती करून त्यांचा वापर करणे..
- शाळेत भाषा व गणित प्रयोगशाळा तयार करणे.
- ज्ञानरचनावादी वर्ग तयार करणे.
- अन्य शाळांतील प्रयोगशील उपक्रमांचा अभ्यास करून त्यांतील काही उपक्रम आपल्या शाळेत कार्यवाहीत आणणे.
- विषय अध्यापक महामंडळांची राज्यस्तरीय अधिवेशने तसेच साहित्य संमेलने इत्यादींमध्ये शाळेने सहभागी होणे.
- मूल्यमापन तंत्रांचा व्यवस्थित अभ्यास करून त्यासाठी उपयुक्त साहित्यनिर्मिती करणे.
- 'शिक्षण संक्रमण', 'जीवन शिक्षण' यांसारख्या नियतकालिकांचे वाचन करणे. या मासिकांसाठी लेख लिहिणे.
- शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी MS-CIT सारखे संगणक प्रशिक्षण घेणे.
- शाळेत 'समुपदेशन' सुविधा उपलब्ध करणे.
- विद्यार्थी वाढदिवस साजरे करणे.
- शाळेत कला, कार्यानुभव, गणित, विज्ञान, इंग्रजी अध्ययन कोपरे तयार करणे.
वाचा - मराठवाडा मुक्ती दिन | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments