balipratipada in marathi | दिवाळी पाडवा माहिती मराठी
![]() |
balipratipada in marathi | दिवाळी पाडवा माहिती मराठी |
balipratipada in marathi, दिवाळी पाडवा माहिती मराठी
बलिप्रतिप्रदेच्या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. तसेच, 'इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. यंदाची दिवाळी चार दिवसांची आहे. यामध्ये शेवटचा दिवस म्हणजेच बलिप्रतिप्रदेचा. दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा शेवटचा दिवस असतो. या दिवसाला 'दिवाळी पाडवा' असे देखील म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. हिंदू धर्मियांचा हा एक मोठा सण आहे. या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो"
या दिवसाला 'दिवाळी पाडवा' असे देखील म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. विक्रम संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. ह्या दिवशी सर्वांनी पहाटे अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत अशी पूर्वापार चालत आलेली रीत आहे. ह्या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची, तसेच त्यावेळी पतीने आपल्या एखादी भेटवस्तू ‘ओवाळणी’ म्हणून देण्याची एक गोड प्रथा आजही घराघरांमधून आवर्जून पाळली जाते.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक प्रतिपदेला बलिप्रतिपदा सण साजरा केला जातो. बलिप्रतिपदेला बली पूजा असेही म्हणतात, जी गोवर्धन पूजेसोबत येते. हा उत्सव भगवान श्रीकृष्ण आणि गिरीराज यांना समर्पित आहे. बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचे वरदान मिळाले आहे. त्यांची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि प्रत्येक कार्य सिद्धीस जाते, असे मानले जाते. विशेषत: दक्षिण भारतात ओणमच्या वेळी राजा बळीची पूजा केली जाते. पण, उत्तर भारतात कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. तर महाराष्ट्रात यंदा दिवाळी पाडव्याला भाऊबीजे दिवशी बलिप्रतिपदा आहे. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, राजा बळी कोण होता आणि बलिप्रतिपदेचा सण का साजरा केला जातो? जाणून घेऊया दिवाळीमध्ये बलिप्रतिपदा सण साजरा करण्यामागील महत्त्व काय आहे.हा सण भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाचा राक्षस राजा बळीवर विजय आणि पृथ्वीवर त्याच्या आगमनानिमित्त साजरा केला जातो. त्यामागे एक आख्यायिका देखील आहे,
वाचा -भाऊबीज माहिती मराठी | bhaubeej mahiti marathi
काय आहे आख्यायिका ?
शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात आणि एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात आणि ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला शुभा असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत्सर सुरू होतो.
बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.
वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. असे मानले जाते की राजा बळी या दिवशी पृथ्वीवर वास्तव्य करण्यासाठी येतो आणि भक्तांची हाक ऐकतो. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो.
अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
व्यापारी वर्गाचे नववर्ष
अश्विन अमावास्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली. इ. स. पूर्व ५७ पासून ही कालगणना प्रचलित आहे. इ. स. पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे, सर्वागीण सभ्यतेचे आणि एकछत्री राज्यव्यवस्थेचे हे एक उदाहरण आहे. यावर्षी दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे महत्त्व दुपटीने वाढले आहे. बहीण भावांच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी भोजनास गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले, अशी मान्यता आहे. दिवाळीतील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असल्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो 2 तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा! 3 तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा! 4 पाडवा करी पती पत्नीच्या प्रेमाची आठवण... साजरा करुया दिवाळी पाडवा... भेटवस्तू, आनंद, आणि जवळकीची साठवण...दिवस हा वाढवी नात्यातील गोडवा,पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 5 दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा.. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा). साडेतीन मुहूर्तापैकी एक.. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा... शुभ दीपावली! 6 इडा पिडा टळु दे बळीराजाचे राज्य येवु दे... बलिप्रतिपदा व दिपावली पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 7 धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान, मानाचे लक्ष्मीपुजन, संबंधाचा फराळ, समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा !!! 8 साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, उत्तम दिनाचे माहात्म्य आहे, सुखात जावो तुम्हाला हा पाडवा, असाच राहो नात्यातला गोडवा.दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 9 शुभ मुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया, भिन्न विभिन्न असलो तरी सर्व मनाने एक होऊया...दीपावली पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा 10 स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 11 उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आला दिवाळी पाडवा पणतीतल्या दिव्याच्या तेजाने उजळेल आपल्या आयुष्याची वाट!दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
पूर्वी गावाकडे घराघरातले गुराखी आपली गुरे रानात चारायला जायचे. तिथे त्या गुरांना बिबट्यांचे भय असायचे आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे गुराखी हातात काठी बाळगायचे. आपले गोधन वाचवण्यासाठी ते त्या बिबट्यांना काठीने हाणून पळवायचे. त्याचीच आठवण देणारे हे लोकगीत. हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. मुळात दिवाळी हा सणच शेतकऱ्यांचा आहे, याची आठवण या दिवसामुळेच येते.
शेतकरी आज घराला, गोठ्याला झेंडूच्या माळा लावून सजवतो. गुरांना ओवाळतो. त्यांना गोडधोड घालतो. नेहमीच्या गुराख्याला आणि स्त्रियांना गोठ्यातील कामापासून सुट्टी दिली जाते.
वाचा - धनत्रयोदशी पूजा कशी करावी, dhantrayodashi 2022 in marathi
कोणकोणत्या भागात कशा पद्धतीने हा सण साजरा करतात ?
- कोकणात आज गोठ्यातील गुरे बाहेर आणून बांधली जातात. गोठा स्वच्छ केला जातो. गोठ्यात शेणाचा गोठा तयार केला जातो. त्यात छोट्या कारीट या रानफळांना हिरसुणीचे (माडाच्या झावळांचे हीर काढून केलेली झाडू) हीर टोचून त्यांची गुरे करून ठेवली जातात. शेणाचा गुराखी, कृष्ण, गौळणी आणि पाच पांडव केले जातात. अर्धे कापलेल्या पोकळ कारिटात दूध घालून त्याचे दूधहंडे केले जातात. येणाऱ्या जाणाऱ्यांना ताक दिले जाते.
- मराठवाड्यात गुरांना ओवाळण्यासाठी लव्हाळ्याच्या (एक प्रकारचे गवत) दिवट्या करतात. या दिवटीने घरातल्या गाय-बैलांना मनोभावे ओवाळले जाते. त्यांच्या मागच्या-पुढच्या पायांवर चंद्र-सूर्य रेखले जातात. येथेही शेणाच्या गवळणी तयार केल्या जातात. डोक्यावर दुधाच्या घागरी घेतलेल्या गवळणी आणि शेणाचेच पाच पांडव तयार करून घराघरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो.
- ठाणे-रायगड भागातील आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते. या दिवशी दारासमोर तांदळाच्या पिठीपासून `कणे` (रांगोळी) काढले जातात. या कण्यांत चार दिशांना चार आणि एक मध्यभागी असे एकूण पाच शेणगोळे ठेवले जातात. या प्रत्येक गोळ्याला बळीराजा मानून त्याला झेंडूचे फूल वाहिले जाते. ही पूजा यथासांग पार पडल्यावर हे बळीराजाचे शेणाचे गोळे घरावर फेकले जातात. बळीराजाची आपल्या घरादारावर कायम कृपा राहावी, अशी यावेळी प्रार्थना केली जाते.
- धनगर समाजात हा दिवस त्यांच्या मेंढ्यांच्या कौतुकाचा सण. मेंढ्यांच्या विविध स्पर्धा घेतात. मेंढा-मेंढीचे लग्न या दिवशी लावतात. त्यासाठी मेंढा-मेंढीला विशेष सजवले जाते. मेंढीच्या गळ्यात हळकुंडाचा गोफ बांधतात, तर मेंढ्याच्या गळ्यात पानसुपारीचा गोफ. खंडोबा-बिरोबाची गाणी म्हणत त्यांचे लग्न लावलें जातें. मेंढ्यांच्या लेंड्यांपासून वाडा तयार करतात. वाडा म्हणजे अगदी अख्खे गाव वसवून त्यात घरे, घरातली माणसे, असा देखावा तयार करतात.
- आदिवासी समाज आपल्या गुरांच्या-बकऱ्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा करतात. ते निवडुंगाचे काप करून त्याच्यात दिवे पाजळतात. बलिप्रतिपदेचा दिवशी आदिवासी आपले गोधन एकत्र करतात आणि गावाबाहेर नेतात. गावाबाहेर त्यांनी आधीच एक आखाडा तयार केलेला असतो. त्या आखाड्यात गवत पेटवून ते धूर करतात आणि त्या धुरातून गाय, बकऱ्यांना बळीराजाच्या नावाने पळवत नेतात. या धुरातून गोधन नेल्यावर त्यांना कसलाही आजार होत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे. याला आदिवासी 'ढोर उठवणे' असे म्हणतात.
- पाठारे प्रभू समाजातील घराघरांत घोड्यावर बसलेल्या बळीराजाची मूर्ती असते. या दिवशी पहाटेच प्रभू गृहिणी घरातला केर-कचरा काढते आणि घराबाहेर टाकायला जाताना थाळा वाजवत म्हणते- इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. हे बळीचें राज्य म्हणजे अर्थातच शेतकरी राजाचें राज्य.
- गोवर्धन पूजा
दिवाळीचा हा चौथा दिवस `वर्ष प्रतिपदा` म्हणूनही जाणला जातो. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.
मथुरेकडे बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. याला अन्नकूटोत्सवही म्हटले जाते.
प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रित्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्र्पूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत केले गेले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्ण मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला 'अन्नकूट' म्हणतात.
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇 🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇 🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇 🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇 🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇 ▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇 |
0 Comments