भाऊबीज माहिती मराठी | bhaubeej mahiti marathi
![]() |
भाऊबीज माहिती मराठी | bhaubeej mahiti marathi |
भाऊबीज माहिती मराठी, bhaubeej mahiti marathi
भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे.भाऊभीज हा बहीण आणि भाऊ यांच्यातील अतूट नात्यासाठी समर्पित हिंदु उत्सवांपैकी एक आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. भाऊबीज (Bhaubeej) हा बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस. वसुबारसपासून सुरू झालेल्या दिवाळीची भाऊबीजेला सांगता होते. या सणाला हिंदीत भाईदूज (Bhai Dooj) असं म्हणतात.
रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीजच्या सणालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते, भाऊ-बहीण एकमेकांना भेटून प्रेम, स्नेह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. यावेळी 26 ऑक्टोबर 2022 रोजी भाऊबीज सण साजरा केला जाणार आहे. भाऊबीजेला औक्षण करताना टिळा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया भाऊबीज सणाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.
या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.
या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते.
वाचा - धनत्रयोदशी पूजा कशी करावी, dhantrayodashi 2022 in marathi
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇 🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇 🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇 🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇 🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇 ▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇 |
0 Comments