Subscribe Us

धनत्रयोदशी पूजा कशी करावी | dhantrayodashi 2022 in marathi

धनत्रयोदशी पूजा कशी करावी | dhantrayodashi 2022 in marathi

धनत्रयोदशी पूजा कशी करावी | dhantrayodashi 2022 in marathi
धनत्रयोदशी पूजा कशी करावी | dhantrayodashi 2022 in marathi

धनत्रयोदशी पूजा कशी करावी, dhantrayodashi 2022 in marathi

हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खूप महत्त्व आहे. हा उत्सव त्रयोदशीपासून आश्विन महिन्यातील धनत्रयोदशीपासून सुरू होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते. या दिवशी सोने-चांदीसह घरगुती वापराच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. तसेच या दिवशी जमीन-इमारत आणि वाहनांसह सर्व नवीन वस्तू खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे.

  1. हे पण वाचा 👉लक्ष्मी पूजन कसे करावे

धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला असे म्हणतात. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.

हे पण वाचा ➡️ नरक चतुर्दशी मराठी माहिती 2022

दिवाळी पर्वातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यंदा 2 धनत्रयोदशी तिथी आल्या असल्याने महाराष्ट्रात काही विशेष जिल्ह्यांनी 22 ऑक्टोबरला तर काही जिल्ह्यांमध्ये 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी करावी असे पंचांगकर्ते सांगतात. उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी भगवान धन्वंतरीचे पुजन या दिवशी केले जाते. घरोघरी धनत्रयोदशी पुजन मोठ्या भक्तीभावाने केले जाते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत धनत्रयोदशी पुजेची संपुर्ण माहिती.

हे पण वाचा ➡️ दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

यावर्षी धनत्रयोदशीबाबत संभ्रम आहे. यावेळी अमावास्येला सूर्यग्रहण असल्याने दिवाळीचा सण 25 ऐवजी 24 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. यावरून धनत्रयोदशीची तारीखही बदलली आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी, कपडे खरेदी केले जातात. यासोबतच या दिवशी यमदेव, चित्रगुप्त आणि भगवान धन्वंतरी देव यांचीही पूजा केली जाते. या दिवशी घरात 13 दिवे लावणे शुभ असते.

वाचा -भाऊबीज माहिती मराठी | bhaubeej mahiti marathi

धन्वंतरीची पूजा

धन्वंतरीची पूजा करण्यासाठी धनत्रयोदशीचा प्रदोषकाळ शुभ समजला जातो. शुभ काळात धन्वंतरीची पूजा करण्यासाठी संध्याकाळी आंघोळ करून तयार व्हा. यानंतर आधी गणपतीची, लक्ष्मी मातेची आणि कुबेराची पूजा करतात. यानंतर धन्वंतरीची पूजा करावी. पूजेसाठी सर्व देवांच्या मूर्ती प्रतिमा पूर्व दिशेला अथवा उत्तर दिशेला स्थापन करून पूजा करावी. सर्व देवांच्या मूर्ती प्रतिमा यांना फळ फुल अर्पण करा. हळद कुंकू, रोली, अक्षता, चंदनाने पूजा करा. गोड पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करा. शक्यतो दुधाची खीर प्रसाद म्हणून अर्पण करा. पूजा केल्यानंतर किमान 108 वेळा 'ॐ धन्वंतराये नमः' या मंत्राचा जप करून भगवान धन्वंतरी यांना नमस्कार करावा.

धन्वंतरी आणि गणपती-लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी लाकडाचा पाट घ्या. त्यावर स्वस्तिकचे चिन्ह काढा. त्यावर तेलाची ज्योत असलेला दिवा लावा. दिव्याला हळद-कुंकु आणि तांदुळ लावा. त्यानंतर तुमच्याकडे असलेलं धान्य, धन, सोनं या वस्तूंची पूजा करा. गणपती आणि लक्ष्मीची पूजा करा. नमस्कार करावा. 

धन्वंतरी पौराणिक मंत्र

ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये: अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥

धनत्रयोदशी साजरी करण्याची प्रथा ही धन्वंतरीच्या स्मृतीप्रत्यर्थ सुरू झाली असंही सांगितलं जातं. या दिवशी नैवेद्य म्हणून धणे आणि गुळ ठेवला जातो. यासोबत गूळ, खोबरं, पुरणपोळी किंवा गोडधोड नैवेद्यही दाखवण्याची प्रथा आहे. दारात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य, उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. तर आयुर्वेदात या दिवशी धन्वंतरीची पुजा केली जाते. औषधी वनस्पती लावल्या जातात. या दिवशी झेंडु आणि शेवताच्या फुलांचा बहर किंवा हंगाम असल्यानं या दिवशी या फुलांचे हार सजावटीसाठी वापरतात किंवा देवाला वाहिले जातात. रात्री पणत्या आणि दिव्यांनी विद्युत रोषणाई करून घर आणि गावं उजळवली जातात. अनेक गावांमध्ये आजही पहाटे आणि रात्री पणत्या लावण्याची प्रथा आहे.

धनत्रयोदशीच्या दोन दंतकथा :-👇

पहिली कथा :-👇

एक कथा अशी आहे की, देव आणि राक्षस समुद्रमंथन करत होते. या मंथनातून माता लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. असे सांगतात. याच कारणामुळे धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची प्रथा आहे.

दुसरी कथा :-👇

हेमा राजाच्या पुत्राचा सोळाव्या वर्षी मृत्यू होईल असे भविष्य सांगण्यात आले होते. मृत्यू आधी मुलाला सर्व सुख मिळावे यासाठी राजाराणीने त्याचे लवकर लग्न करून दिले. भविष्यवाणीनुसार लग्नाच्या चवथ्या रात्री मुलाचा मृत्यू होणार होता. त्या रात्री राजवाड्यातील सर्व दारं खिडक्या सोन्याचांदीची नाणी ठेवून बंद करण्यात आली. 

यम सापाच्या रुपात राजवाड्यात प्रवेश करून मुलाच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागला. पण ठिकठिकाणी असलेल्या सोन्याचांदीच्या नाण्यांवर घरात ठिकठकाणी तेवत असलेल्या पणत्या, समया, मशाली यांचा प्रकाश पडत होता. यामुळे नाणी चकाकू लागली. या प्रखर प्रकाशाने सापाचे डोळे दिपले आणि तो राजवाड्यातून लगेच निघून गेला. यामुळे मुलाचा मृत्यू टळला. राजकुमाराचे प्राण वाचले. याच कारणामुळे धनत्रयोदशी या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी पणती तेवत ठेवावी आणि त्या पणतीच्या ज्योतीची दिशा दक्षिणेला करून ठेवावी. यामुळे अपमृत्यू टळतो असे सांगतात.

हे पण वाचा ➡️ दिवाळी पाडवा माहिती मराठी

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇








Post a Comment

0 Comments