Subscribe Us

लक्ष्मी पूजन कसे करावे | lakshmi pujan 2022

लक्ष्मी पूजन कसे करावे | lakshmi pujan 2022

लक्ष्मी पूजन कसे करावे | lakshmi pujan 2022
लक्ष्मी पूजन कसे करावे | lakshmi pujan 2022

लक्ष्मी पूजन कसे करावे, lakshmi pujan 2022

दिवाळीचा सण साजरा होत आहे. यासह नवीन महालक्ष्मी वर्ष सुरू होत आहे. या वर्षी तुमच्या घरात धन-संपत्तीचे आगमन व्हावे आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहावी, यासाठी लक्ष्मीमातेसह गणेश आणि कुबेराची पूजा करण्याचा विधी शास्त्रात सांगितल्या आहेत. प्रदूषणाच्या काळात निश्चित लग्नात कार्तिक कृष्ण अमावस्येच्या तिथीला दिवाळी पूजन केल्याने अन्न आणि धनाची प्राप्ती होते असे शास्त्रात सांगितले आहे.

हे पण वाचा ➡️ दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

दिवाळीत येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला खूपच जास्त महत्व आहे. वेगवेगळ्या स्तरातील लोक हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. लक्ष्मीचा वास आपल्याकडे कायम राहावा म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते. त्यामुळे दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्व आहे. लक्ष्मी पूजनासंदर्भातील अनेक कथा, दंतकथा या प्रसिद्ध आहेत. लक्ष्मी पूजनाची माहिती जाणून घेताना लक्ष्मीची उत्पत्ती कशी झाली ते माहीत करुन घेणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गासाठी हा अत्यंत महत्वाचा असा दिवस मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी जे समुद्रमंथन झाले त्या दिवशी त्या समुद्र मंथनातून लक्ष्मीची निर्मिती झाली. त्यामुळेच शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्यानंतर येणाऱ्या अमावस्येला कालीमातेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पण बदलत्या कालांतराने दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत सुरु झाली. पण दुसऱ्या माहितीनुसार दिवाळीचा काळ म्हणजे अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी ही पृथ्वीवर संचार करते. आपल्या निवासासाठी ती योग्य असे स्थान शोधते (लक्ष्मी चंचल असते)  असे म्हणतात ज्या व्यक्ती या खऱ्या, संयमी, दानशूर,  धर्मनिष्ठ आणि पतिव्रत्या किंवा सच्च्या असतात अशा व्यक्तींच्या घरी लक्ष्मी ही राहणे पसंत करते. या शिवाय असे सांगितले जाते की,  लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते.

वाचा -भाऊबीज माहिती मराठी | bhaubeej mahiti marathi

लक्ष्मी पूजन कसे करावे :-👇

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि झेंडुची फुले असलेले तोरण लावावे. घरात सकारात्मक उर्जा येण्यासाठी घरात गंगाजल शिंपडावे. लक्ष्मीपूजनासाठी एखादा चौरंग किंवा पाट घ्यावा त्यावर लाल रंगाचे कापड घालावे. थेट चौरंगावर पूजा मांडू नये. चौरंग किंवा पाटाच्या आजुबाजूला छान रांगोळी काढावी. तांदुळ घेऊन त्याचे स्वस्तिक लाल रंगाच्या कपड्यावर काढावे. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. आंब्याची पाने आणि नारळ ठेवून तो कलश बसवावा. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीचे स्थान असते. म्हणून त्या ठिकाणी कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. उजव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी. फुलांची आरास करुन देवांना अक्षता वाहून घ्याव्यात. देवी लक्ष्मी मातेसमोर नाणी ठेवावीत. उदबत्ती, दिवा लावून आता मनोभावे देवीचे नाम: स्मरण करावे. लक्ष्मी मातेची आरती करुन तिला नैवेद्य दाखवून पाया पडावं.

🔰 लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी :-

▶️ लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अगदी शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या साहित्याची किंवा या गोष्टींची खरेदी करायला काहीच हरकत नाही.

▶️ नवे घर घेण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. त्यामुळे नव्या घराचे बुकींग किवा नव्या घरात राहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. 

▶️ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही घरात नवीन पुस्तकांचीही खरेदी करु शकता. 

▶️ झाडूची खरेदी या दिवशी करायलाच हवी. ज्यांना घरात नवा झाडू हवा असेल त्यांनी या दिवशी खरेदी करावा असे म्हणतात. केरसुणी ही घरातली अशी वस्तू आहे जी घर स्वच्छ ठेवते आणि घरात स्वच्छता ठेवण्याचे काम करते. ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते. 

▶️ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी आवर्जून सोन्याची खरेदी करायला हवी. सोने हा असा संचय आहे जो तुम्हाला अडचणीच्या काळात कधीही मिळू शकतो. खूप जण सोने घेऊन ठेवतात आणि त्याचा उपयोग ज्यावेळी गरज असेल त्यावेळी सोने मोडून किंवा गहाण ठेवून करता येतो. त्यामुळे या दिवशी अगदी हमखास सोने खरेदी करा. ते तुमच्या धन संचयात वाढ करते.

▶️ घरी एखादी नवीन मशीन आणण्यासाठी किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. 

▶️ एखाद्या नव्या कामाची सुरुवात करायची असेल ती देखील तुम्ही या दिवशी करु शकता. नवी कपड्यांची खरेदी करण्यासही या दिवशी काहीच हरकत नाही. नवीन कपडे घालून पूजा केल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण ही येते. 

▶️ नवे वाहन खरेदी करण्यासाठी किंवा ते घरी आणण्यासाठी हा अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो.


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇



Post a Comment

0 Comments