Udise Plus 2022-23 Maharashtra | udise plus form 2022-23 pdf
![]() |
Udise Plus 2022-23 Maharashtra | udise plus form 2022-23 pdf |
Best mobile under 6500 👇
https://amzn.to/3WMAUGw
Udise Plus 2022-23 Maharashtra, udise plus form 2022-23 pdf
तपशील | डाऊनलोड |
UDISE PLUS मराठी नमुना PDF | |
UDISE PLUS इंग्रजी PDF | |
UDISE PLUS वेबसाईट | |
वाचा 👉 UDISE PLUS माहिती कशी भरावी
वाचा 👉Udise Plus माहिती भरण्याबाबत शाळास्तर,केंद्रस्तरावरील मार्गदर्शक सूचना
वाचा 👉कोणत्याही शाळेचा Udise नंबर कसा शोधायचा
प्रति,
१) मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, सर्व
२) विभागीय शिक्षण उपसंचालक,
मुंबई विभाग, मुंबई.
३) शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी,
महानगरपालिका, सर्व.
विषय : सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती सन २०२२-२३ यु डायस प्लस ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना. (https://udiseplus.gov.in/)
संदर्भ : स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. D.O.No. २३-७/२०२२- Stats दि. ३० ऑगस्ट, २०२२.
भारत सरकारकडून संदर्भिय पत्राद्वारे राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत करण्याकरिता कळविले आहे. यु-डायस प्लस प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक (PGI), National Achievement Survey (NAS), School Education Qulty Index (SEQI) निर्देशांकांची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे.
वाचा - कोणत्याही शाळेचा Udise Number कसा शोधायचा ?
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्यामध्ये माहिती संकलित करण्यात येणार आहे.
प्रथम टप्प्यामध्ये शाळेची सांख्यिकी माहिती (शाळेचे ठिकाण, व्यवस्थापन, माध्यम, इत्यादी) शाळा सुरक्षा, अनुदान व खर्च, व्यावसायिक प्रशिक्षण, भौतिक सुविधा, साहित्य उपक्रमे, संगणक आणि नाविन्यपूर्ण डिजीटल उपक्रम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग इत्यादि माहिती संगणकीकृत करण्यात येणार आहे. याकरिता सर्व शाळांना तालुका स्तरावरून Username व Password उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
दुसर्या टप्यामध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, मोबाईल नंबर, घराचा पत्ता, वर्ग, जनरल रजिस्टर नंबर, जन्म दिनांक, जात, BPL, दिव्यांगांचे प्रकार, शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या सुविधा, व्यावसायिक शिक्षण संबंधित माहिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती, आधार संबंधित माहिती, RTE प्रवेश, सहाय्यभूत सुविधा इ. यु-डायस प्लस सॉफ्टवेअरमध्ये शाळास्तरावरून अद्ययावत करण्यात येणार आहे.
वाचा - UDISE PLUS माहिती कशी भरावी
वाचा - Udise plus password reset कसा करावा ?
दि. १७ ऑक्टोबर २०२२ पासून यु-डायस प्रणालीमध्ये शाळांची माहिती संगणकीकृत करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय सूचना केंद्र, शालेय शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सन २०२२-२३ चे यु-डायस प्रपत्राबाबत झालेले बद्दल याबाबत जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांना दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी यु डायस प्लस प्रणालीचे काम करण्याऱ्या अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करून जिल्ह्यातील यु-डायस संबंधित काम करणारे संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, Data entry operator, MIS-Coordinator, सहा. कार्यक्रम अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता काम करणारे अधिकारी, मोबाईल शिक्षक, इ. अधिकाऱ्यांचे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात यावे. सदरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुकास्तरावर याचप्रमाणे तालुक्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशिक्षणामध्ये माहिती संकलनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात यावे. सदरची माहिती भारत सरकार व राज्य सरकार विविध योजनांच्या अंमलबजावणासाठी करणार असल्याने सदरची माहिती अचूक असणे आवश्यक आहे.
वाचा - UDISE PLUS मराठी नमुना फाॅर्म PDF▶️ UDISE PLUS इंग्रजी नमुना फाॅर्म PDF▶️ UDISE PLUS वेबसाईट
भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सर्वांना कळविण्यात येते, की सन २०२२-२३ या वर्षातील सर्व शाळांची माहिती दि. १० नोव्हेंबर, २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने संगणकीकृत करून अंतिम माहिती भारत सरकारला वेळेत सादर करण्याकरिता आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे. सन २०२३-२४ समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक भारत सरकारला सादर करण्यात येणार आहे व याच माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो.
माहिती संकलनासाठी सन २०२२-२३ चे यु-डायस प्रपत्र भरण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचनापत्र जोडले आहे.
(कैलास पगारे, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक,
म.प्रा.शि.प., मुंबई.
पत्र पहा.👇👇
0 Comments