Subscribe Us

सावित्रीबाई फुले भाषण | balika din bhashan 3

सावित्रीबाई फुले भाषण | balika din bhashan 3




सावित्रीबाई फुले भाषण, balika din bhashan 3

अध्यक्ष महोदय,

पुज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 3 जानेवारी. आज भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती.

सावित्रीबाई जोतीराव फुले या थोर भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे आहे. इ.स. 1840 साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. विवाहानंतर जोतिरावांनी सावित्रीबाईंना लिहायला, वाचायला शिकवले. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. आणि या शाळेत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षिका म्हणून काम केले.

हे पण वाचा➡️ जिजाऊ जयंती Youtube वरील भाषण

यावेळी अनेक लोकांनी त्यांना विरोध केला. अंगावर शेण, दगड, चिखल टाकला. पण तरीही सावित्रीबाईंनी आपले ज्ञानदानाचे काम चालूच ठेवले. सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह, विधवांचे केशवपन, सतीप्रथा याविरोधात जागृती निर्माण करण्याचे काम केले. सावित्रीबाई फुले यांनी काव्यफुले हा काव्यसंग्रह, सुबोध रत्नाकर, बावनकशी ही पुस्तके लिहिली.सावित्रीबाईंना क्रांतिज्योती म्हणूनही ओळखले जाते.

सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन हा "बालिका दिन" म्हणून साजरा केला जातो.

पुण्यामध्ये प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि अखेर 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं,

ज्ञानाची ज्योत होऊन

घेतला वसा स्त्री शिक्षणाचा...... 

वंदन करुनी जयजयकार करुया 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा 

हे पण वाचा➡️ जिजाऊ जयंती भाषण प्रश्नमंजुषा

वाचा👉 मा.विभागीय आयुक्त शालेय उपक्रम यादी

हे पण वाचा 👉शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध

हे पण वाचा 👉ऑलिम्पिक विजेते | olympic vijeta list

हे पण वाचा 👉 Astronomy Club | ग्रहांची नावे मराठी व इंग्रजी

येथे क्लिक करा.▶️ शिक्षक बदली वेबसाईट

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇











Post a Comment

0 Comments