Subscribe Us

चंद्रग्रहण मराठी माहिती | chandra grahan 2023

चंद्रग्रहण मराठी माहिती | chandra grahan 2023

व्हिडिओ पहा👇


चंद्रग्रहण मराठी माहिती, chandra grahan 2023

🔰 चंद्रग्रहण :-

जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. 

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवत नाही.

🌀 चंद्रग्रहण प्रकार :-👇

1) खग्रास चंद्रग्रहण.👇

जेव्हा चंद्र (पृथ्वीवरून पाहिले असता) पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खग्रास चंद्रग्रहण होते. खग्रास ग्रहणात पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये शिरल्याने चंद्रावर सूर्यप्रकाश पडत नाही. परिणामी चंद्र पूर्णपणे काळा दिसला पाहिजे, असे वाटणे साहजिकच आहे. मात्र असे घडत नाही. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामधून प्रकाशकिरण अपवर्तित होऊन चंद्रावर पडतात. त्यातही लाल रंगाच्या प्रकाशकिरणाचे सर्वात जास्त अपवर्तन होत असल्याने अनेक ग्रहणांच्या वेळी चंद्र तांबूस दिसतो.

2) खंडग्रास चंद्रग्रहण.👇

जेव्हा चंद्राचा काही भाग (पृथ्वीवरून पाहिले असता) पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खंडग्रास चंद्रग्रहण होते.



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇









Post a Comment

0 Comments