कृष्ण विवर माहिती मराठी | krishna vivar माहिती marathi
कृष्ण विवर माहिती मराठी | krishna vivar माहिती marathi
Black hole कृष्णविवर ही काही ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रूपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की प्रकाशदेखील त्यांपासुन सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा ताऱ्यांना कृष्णविवर म्हणतात.
कृष्णविवराची कल्पनाच खूप भितीदायक आहे.
कृष्णविवर (black hole) अंतराळामध्ये अशी जागा आहे जिथे गुरुत्वाकर्षण बळ खूप जास्त असतं. एखाद्या ग्रहावरून त्याच्या गुरुत्वाकर्षण बळापासून सुटायला आणि बाहेर जायला एक ठराविक गतीने जावं लागतं. उदा: पृथ्वीवरून बाहेर जाण्यासाठी 11.2 किमोमिटर प्रती सेकंद ची गती लागते. ती नसल्यास आपलं यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरच आपटेल.
कृष्णविवराचे गुरुत्वाकर्षण बळ इतके जास्त असते की प्रकाश जी सृष्टीतली सर्वात जलद वस्तू आहे - सुद्धा कृष्णविवरातुन सुटू शकत नाही. एखादी वस्तू कृष्णविवराजवळ आली आणि त्याच्या गुरुत्वाकर्षण बळाने त्या वस्तूला धरलं की ती वस्तू कृष्णविवरात पडतेच. ह्याला कोणताही अपवाद नाही.
🔰 Black hole / कृष्णविवर कसे बनतात ?
एखाद्या ताऱ्याच्या जीवनाच्या शेवटी त्याच्या गुरुत्वाकर्षण बळाने ताऱ्याचं सुपरनोवा मध्ये रुपांतर होतं आणि मग तो त्याच्या बाहेरच्या बाजूचा भाग अंतराळामध्ये फेकतो आणि विस्फोट करतो. त्या नंतर उरलेला गाभा (core) स्वतःच्याच वजनाखाली कोसळतो. मग त्याचे रूपांतर कृष्णविवर मध्ये होतं. प्रत्येक ताऱ्याबरोबर असं होत नसतं आणि आपल्या सुर्याबरोबर सुद्धा असं होणार नाही.कृष्णविवर बनण्याची अजुन सुद्धा कारणं आहेत पण ती सगळी सांगायला इथे जागा नाही.
🔰 पृथ्वीला कृष्णविवर पासून धोका आहे का ?
मोनोसीरोटीस (V616 Mon) सगळ्यात जवळचं कृष्णविवर आहे आणि ते पृथ्वीपासून 3,000 प्रकाशवर्ष अंतरावर आहे म्हणून आपल्याला काही धोका नाही.कृष्णविवराच्या संदर्भात आल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला स्टीफन हॉकिंग यांनी पुंज वादाची जोड देऊन नवी गृहिते मांडली होती. कृष्णविवरामध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण असते आणि त्यामुळे त्याच्या कक्षेत येणारे ग्रह, तारे यांना हे विवर गिळत असते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. या कृष्णविवरांच्या प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे प्रकाश किरणदेखील बाहेर पडू शकत नाहीत असे समजले जात होते. परंतु कृष्णविवरातून किरणांचे उत्सर्जन होत असल्याचे स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या गृहितकांच्या आधारे पटवून दिले होते. स्टीफन हॉकिंग यांच्या दाव्यानुसार कृष्णविवर नावाची गोष्टच नसते असा त्यांचा दावा आहे.

0 Comments