लुई पाश्चर माहिती | louis pasteur marathi mahiti
![]() |
लुई पाश्चर माहिती | louis pasteur marathi mahiti |
लुई पाश्चर माहिती, louis pasteur marathi mahiti
🔰 नाव - लुई पाश्चर
🔰 जन्मतारीख : 27 डिसेंबर,1822
🔰 मृत्यूची तारीख : 28 सप्टेंबर, 1895
🔰 जन्मस्थळ : Dole, फ्रान्स
लुई पाश्चर हे फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. ते प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो. लुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली.
फ्रान्समध्ये ज्युरा येथील डोल या लहानश्या गावात लुई पाश्चर यांचा जन्म २७ डिसेंबर १८२२ साली झाला. लुई यांच्या वडिलांचे नाव जोसेफ पाश्चर हे होते. लुई आपल्या भावंडांबरोबर अतिशय गरिबीत वाढले. लुई यांचा स्वभाव अतिशय कोमल व संवेदनशील होता. त्यांना निसर्गात रमायला खूप आवडे. लुई यांची रेखाटने अतिशय सुंदर असत. १८२७ पर्यंत लुई यांचे बालपण अर्बोई इथे क्विसान्स या नदीकाठी गेले.
वाचा👉 मा.विभागीय आयुक्त शालेय उपक्रम यादी
लुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. बॅक्टेरियाचा संसर्ग थांबविण्यासाठी दूध आणि वाइनवर उपचार करण्याच्या तंत्राचा शोध त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी लावला आहे. ही प्रक्रिया आता पाश्चरायझेशन या नावाने ओळखली जाते. लुई पाश्चर यांना बॅक्टेरियोलॉजीच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि ते मायक्रोबायोलॉजीचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत.
लुई पाश्चर यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले. जीवाची उत्पत्ति निर्जीव पदार्थांपासून होते असा समज त्या काळात प्रचलित होता. तत्कालीन समाजातील अनेक मान्यवर ह्या समजाचे खंदे पुरस्कर्ते होते. परंतु लुई पाश्चर यांनी आपल्या प्रयोगांनी ह्या समजामागील शास्त्रीय फोलपणा स्पष्ट केला आणि जीवाची उत्पत्ती जीवापासूनच होते हे सिद्ध करून दाखविले.
द्राक्षापासून अल्कोहोल बनविण्यासाठी त्या फळाच्या पृष्ठभागावर असलेल्या यीस्ट नावाच्या पेशी जबाबदार असतात हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी उकळलेल्या द्राक्षांचे अल्कोहोल होत नाही हे दाखवून दिले. आपल्या एका साध्या प्रयोगाने लुई पाश्चर यांनी आपले म्हणणे सप्रमाण सिद्ध केले. बदकासारखी लांब मान असलेल्या काच पात्रात लुई पाश्चर यांनी उकळलेले खाद्य द्रावण ठेवले व त्या पात्राच्या मानेत कोणतेही सूक्ष्म कण न जातील अशी बारीक जाळीदार योजना करून त्यात फक्त हवा जाईल अशी व्यवस्था केली. ते खाद्य द्रावण कित्येक दिवस अगदी संपूर्णपणे निर्जंतुक राहिले. पण ते द्रावण उघड्या हवेला ठेवले तर मात्र जंतु, अळ्या, बुरशी यासारखे जीव त्यात वाढतांना दिसून आले. यावरून जीवाची उत्पत्ति जीवापासूनच होते हे सिद्ध झाले.
लुई पाश्चर यांचे आणखी एक महत्त्वाचे संशोधन समस्त मानव जातीसाठी वरदान ठरले आहे. रेबीज आणि अँथ्रॅक्स या दोन रोगांवर त्यांनी प्रतिबंधक लशींची निर्मिती यशस्वीपणे केली होती. कोंबडयांच्या पिल्लांमध्ये कॉलरा यारोगाचा प्रादुर्भाव नेहेमी होत असतो. त्या रोगाच्या जीवाणूंना प्रयोगशाळेत वाढवून पाश्चर यांचे प्रयोग सुरु होते. अनावधानाने त्यातील काही कल्चर खराब झाले. ते टोचल्यानंतर कोंबडया आजारी पडल्या परंतु नंतर मात्र त्या अगदी ठीक झाल्या, एवढेच नव्हे तर त्यांना रोग निर्माण करणारे जंतू टोचले तरी त्यांना कॉलरा झाला नाही. यावरून त्या कोंबडयांच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती निर्माण झाली असा निष्कर्ष त्यांनी काढला. या निष्कर्षावर आधारित काम त्यांनी अँथ्रॅक्स जीवाणूंवर अशीच लस निर्माण करण्यासाठी केले आणि अँथ्रॅक्सवर लस उपलब्ध झाली.
🔰 लुई पाश्चर यांचे कार्य :-👇
➡️ लुई पाश्चर यांनी हवेमधील धुळीत सूक्ष्मकण असतात हे स्पष्ट केले.
➡️ लुई पाश्चर यांनी दूध टिकवण्यासाठी निर्जंतुकीकरण या प्रक्रियेचा शोध लावला. या प्रक्रियेला त्यांच्या नावावरून पाश्चरायझेशन असे म्हणतात.
➡️ कुत्र्याच्या चावण्याने होणाऱ्या रेबीज या रोगावरची लस शोधण्याचे काम लुई पाश्चर यांनी केले.
➡️ अनेक महाविद्यालयात लुई पाश्चर यांनी प्राध्यापकाचे काम केले.
0 Comments