स्वामी विवेकानंद bhashan marathi | swami vivekananda bhashan in marathi
स्वामी विवेकानंद bhashan marathi, swami vivekananda bhashan in marathi
सन्माननीय गुरुजनांना माझा सादरप्रणाम..
"मित्रांनो, माझ्या बंधू आणि भगिनींनो." असं समोरच्या श्रोतेवर्गाला संबोधून आपल्या अस्खलित वाणीनं... ओजस्वी विचार मांडणारे तेजस्वी पुरुष आपल्या भारतातच होऊन गेले. शतक लोटलं... पण आजही त्यांचं कार्य केवळ भारतातच नाही. तर जगभर चालू आहे. अगदी मनापासून भक्तिभावानं त्यांचे कार्यकर्ते रामकृष्ण मिशन या संस्थेचं काम करत आहेत. शिवाय ठिकठिकाणी असलेली विंवेकानंद केंद्र देखील आपल्याला ज्ञात आहेतच. मुलांवर चांगले संस्कार घडविणं, मुलांना वाचनाची आवड लावणं, एकाग्रता आणि आरोग्यासाठी योग- साधना करणं, आपली अस्मिता जपणं, एक ना अनेक समाजोपयोगी उपक्रम या केंद्रामार्फत राबविले जातात. या सगळ्याचे मूळ स्त्रोत... प्रेरणा... म्हणजे . 'स्वामी विवेकानंद!' ... मी त्यांना माझे आदर्श मानतो.
विश्वनाथबाबू दत्त व भुवनेश्वरी यांचे चिरंजीव नरेंद्र... शिवाच्या नवसानं झालेला मुलगा, श्रीमंतीत कौतुकात वाढत होता. आईनंकेलेले उच्च संस्कार, वडिलांची सामाजिक बांधिलकीची जाणीव, त्यांचे उदात्त विचार, त्यासोबतच मिळालेले चांगले शिक्षण ! या सगळ्याचा परिणाम नरेंद्रवर होत होता आणि यातूनच घडत घडत नरेंद्रचा विवेकानंद .. झाला. लोक त्यांना ' स्वामीजी ' असे आदराने हाक मारु लागले... त्यांचे भक्त झाले. ते काही त्यांनी दैवी चमत्कार दाखविले म्हणून नाही !... अंधश्रद्धा ही रुढी त्यांना मान्यच नव्हती ते फक्त ज्ञान आणि विज्ञानावर. विश्वास ठेवत असत. त्यातच रामकृष्ण परमहंसच्या रुपाने त्यांना गुरु. मिळाला. तो ही एक दिव्यपुरुषच ! एकां दिव्यपुरुषाने दुसरा दिव्यपुरुष घडविला. ज्योत से ज्योत जलाते चलो या प्रमाणं रामकृष्णांनी आपल्या साधनेचा-ज्ञानाचा वारसा विवेकानंदांना दिला. विवेकानंदांनी देखील गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा... म्हणत गुरुंची कीर्ति वाढविण्याचाच प्रयास केला.
हे पण वाचा➡️ जिजाऊ जयंती Youtube वरील भाषण
स्वामीजींनी भारतभर प्रवास केला. या दरम्यान त्यांनी भारतातील गोरगरीब जनतादेखील पाहिली आणि श्रीमंतीत मस्त दंगलेली जनता देखील पाहिली. दोघांच्यात एकच साम्य त्यांना आढळलं. दोघं ही आपली अस्मिता-स्वाभिमान विसरले होते ! गरीब भुकेपोटी आणि श्रीमंत पैशापोटी ! समाजाचा मध्यमस्तर आज चाललंय... उद्या ही चालेल ! म्हणून सुस्त होता. त्याला कशाशीच काही घेणं-देणं नव्हतं !
त्यांच्या या भारतभ्रमणात घडलेले किस्सा सांगतो... यावरुन स्वामीजी आपली अस्मिता-स्वाभिमान किती जपत होते हे तुमच्या ध्यानात येईल.
अबूरोेड रेल्वेस्थानकावरुन पुढच्या प्रवासाला स्वामीजी निघाले. त्यांना निरोप देण्यासाठी जगमोहनलाल हे रेल्वेतच कामाला असलेले त्यांचे बंगाली मित्र आले होते. गाडी सुटायला वेळ होता. दोघं जण गप्पा मारत बसले होते. इतक्यात इंग्रज तिकीट-तपासनीस डब्यात चढला. जगमोहनलालना तिकीट नाही तर खाली उतरा असं उद्धटपणे बोलू लागला. आता रेल्वे कर्मचाऱ्याला तिकीटाची काय जरुर ? ते तपासनीसाला परोपरीनं सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण व्यर्थ ! शेवटी स्वामीजी मध्ये पडले. तुम काहे बात करते हो ? म्हणून तो स्वामीजींच्या अंगावर गुरगुरला. तुम हा शब्द हिंदीत तुच्छतेने वापरतात किंवा लहानांना वापरतात. तुम्हाला साधा शिष्टाचार माहिती नाही ? स्वामींजींच्या या शाब्दिक हल्ल्यानं गांगरून जाऊन तिकीट तपासणीसानं त्याला हिंदी फारसं येत नसल्याची कबुली देऊन म्हणाला, "मी फक्त या माणसाला!" या माणसाला हे शब्द ऐकून स्वामींजीनी त्याला पुन्हा सज्जड दम दिला.
तुमच्या इंग्रजीत देखील कुणालाही नुसत MAN न म्हणता "GENTLMAN" म्हणतात. तुमची प्रवाशांशी असभ्य वर्तनाबद्दल तक्रारच केली पाहिजे.'' ...टी. सी. नं काढता पाय घेतला. नंतर स्वामीजी म्हणाले या इंग्रज लोकांशी वागताना आपण उगीचच स्वतःला कमी समजून अपमान सहन करतो आपण काही कमी नाही. न्यूनगंड मनातून काढून टाकून ताठ मानेनं स्वाभिमानानं वागलं पाहिजे. आपले हे विचार अतिसामान्यापर्यंत पोहचविण्याचं, त्यांच्यात जागृतीची ज्योत पेटविण्याचं मोलाचं कार्य त्यांनी केलं. आपल्या साहित्यिक अभ्यासाचं-ज्ञानाचं दान करुन ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. ही उक्ती साध्य करुन दाखवली. हे त्यांना शक्य झालं. कारण त्यांचा स्वतःवर विश्वास होताच. पण ईश्वरावर प्रचंड श्रद्धा आणि विश्वास होता ! स्वामीजी लोकांना आपल्या व्याख्यानात नेहमी सांगत ज्याचा ईश्वरावर विश्वास असतो त्यांच्याच स्वतःवर विश्वास असू शकतो... या संबंधी आणखीन एक किस्सा सांगतो... मद्रासमध्ये काही महाविद्यालयीन विद्यार्थी स्वामीजींशी वादविवाद करुन त्यांची फजिती करावी या हेतूनं भेटायला आले. स्वामीजी, ईश्वर म्हणजे काय ? एकानं विचारलं. स्वामीजीनी त्याचा हेतू ओळखला. मित्रा, ऊर्जा म्हणजे काय, ते तू सांगू शकशील ? मुलं स्वामीजींच्या प्रतिप्रश्नानं गोंधळून गेली. निरुत्तर झाली. मित्रांनो, तुम्ही रोज उर्जा वापरता. तरीही उर्जा म्हणंजे काय ते तुम्ही नीट सांगू शकत नाही. आणिं माझ्याकडून मात्र अपेक्षा ठेवता ईश्वर म्हणजे काय? ते सांगण्याची ! नंतर स्वामजींनी उर्जा आणि ईश्वर या दोन्ही संकल्पना त्यांना नीट समजावून सांगितल्या. त्यांचं बोलणं मंत्रमुग्ध होऊन ते विद्यार्थी ऐकत होते. तिथून ते सर्वजण बाहेर पडले. ते स्वामीजींना गुरुस्थानी मानूनच ! अशा प्रकारे भारतात आपल्या वक्तृत्वाने भारताचे भवितव्य घडविणाऱ्या तरुणांच्या हाती ज्ञानाची मशाल दिली, विचारांची आगदिली, प्रेरणा दिली!
पण त्याचबरोबर ज्या आपल्या भारतातील गोर-गरीब जनतेला पुरेसं अन्न-वस्त्र देखील मिळत नाही या विचारांच्या त्यांच्या मनातील भावना कधी-कधी इतक्या तीव्र होत की त्यांच्या डोळ्यातून आसवे गळू लागत. .आपले अंथरुण सोडून ते सरळ जमिनीवर झोपी जात. गुरुंच्या परीक्षेत पात्र ठरणारा विद्यार्थी, आई-वडिलांचे नाव उज्वल करणारा पुत्र, सत्य, निष्ठा, स्वाभिमान, अस्मिता जपणारा हा संन्याशी योद्धा, पाश्चात्य आणि पौर्वात्य राष्ट्रात भारताच्या संस्कृतीची, विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा, त्यांची श्रेष्ठता पटवून देणारा हा व्याख्याता... हिंदू धर्माची ध्वजा जगभर फडकविणारा हा अध्यात्मिक नेता... आपल्यासाठी आदरणीयच आहे. अहो, पाश्चात्यांच्या मनांत देखील सेवेची ज्योत पेटवणाऱ्या, भूतदयेची कास धरणाऱ्या या संन्याशाचे अनेक शिष्य जंगभर तयार झाले. आपल्याला स्वामीजींचे विचार स्वामीजींच्या कर्मयोगं, प्रेमयोग, भक्तीयोग या सारख्या पुस्तकांतूनच तसंच भारतीय व्याख्याने या पुस्तकांतून आजही प्रेरणा देत असतात. आपण करायला हवे फक्त वाचन. कन्याकुमारीला विवेकानंदांचं समाधीस्थळ पहायला कित्येकजण जाऊन आलेत. पण त्यापासून प्रेरणा घेऊन आपण काय केलं ? आज समाजाला विवेकानंदांचीच जास्त गरज आहे. संपूर्ण जमलं नाही तरी अंशत: तरी विवेकानंद बनण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे ? ..
जय हिंद जय भारत.
0 Comments