प्रकल्प लेखन कसे करावे | prakalp lekhan in marathi
प्रकल्प म्हणजे काय मराठी, prakalp in marathi
विद्यार्थ्यानी शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलन शक्ती,स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्प लेखन कसे करावे | prakalp lekhan in marathi
▶️ प्रकल्प कार्य करणे जितके महत्वाचे आहे, तितकेच केलेल्या प्रकल्प कार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्वाचे आहे, कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्प कार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्प कार्य लेखन कसे करावे, याचे मुद्धेसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे.
▶️ विद्यार्थ्यांसाठी:-
1. प्रकल्पाचे नाव विषयासह-निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयाची निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.
2. प्रकल्पाचा प्रकार- निवड केलेला प्रकल्प पुढील पैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा- सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प,तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.
3. प्रकल्पाची योग्य उद्दिष्टे लिहा.
4. प्रकल्पाचे साहित्य- विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखन साहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करावा.
5. प्रकल्पाची कार्यपद्धती- प्रकल्प सकारात असताना कर्नुअत येणाऱ्या कृतीचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.
6. प्रकल्पाचे निवेदन- यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.
7. प्रकल्पाचे सादरीकरण- संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदत्कार्याचाही उल्लेख करा.घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.
8. आकृत्या व चित्रांकणासाठी- येथे प्रकल्पाशीसंबंधित चित्रे आकृत्या नकाशे चिटकवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.
9. प्रकल्पपूर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद-यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.
10. मूल्यमापन- यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले?
✳️ शालेय प्रकल्पासाठी यादी :-
1. माहीती संकलन - थोर संत, थोर समाजसुधारक,थोर राष्ट्रपुरुष,थोर शास्त्रज्ञ,थोर खेळाडू,थोर समाजसेवक,थोर समाजसेविका इत्यादी.
2. संग्रह : म्हणी संग्रह, वाक्यप्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोकसंग्रह,
सुविचारसंग्रह, कवितासंग्रह, भावगीतसंग्रह, पोवाडासंग्रह, समरगीतसंग्रह, देशभक्तीपरसंग्रह, गीते पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह इत्यादी.
3. प्रदर्शन : चित्रकलाकृती प्रदर्शन,ग्रंथप्रदर्शनपुस्तकेप्रदर्शन विज्ञान प्रकल्प प्रदर्शन विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.
4. तक्ते : शालेय शैषणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी.
5. आदर्श : आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका आदर्श महिला आदर्श गाव आदर्श शहर आदर्श राष्ट्र इत्यादी.
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments