Subscribe Us

संपात सहभागी झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत

संपात सहभागी झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत


संपात सहभागी झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत

✳️ बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत.

🔰 सामान्य प्रशासन विभाग

🔰 सांकेतांक क्र-202304131612516907

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या दि. १४ मार्च ते २० मार्च, २०२३ या कालावधीत संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी / अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, त्यांची अनुपस्थिती संदर्भ क्र. २ येथील दि. २८ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये "असाधारण रजा" म्हणून नियमित करण्यात आली होती. या आदेशात सुधारणा करून अनुपस्थितीचा कालावधी "असाधारण रजा" ऐवजी "अर्जित रजा" म्हणून समजण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक १४ मार्च, २०२३ ते २० मार्च, २०२३ या कालावधीत पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय कर्मचारी/अधिकारी सहभागी झाले होते, त्यांची अनुपस्थिती एक विशेष बाब म्हणून व पुर्वोदाहरण होणार नाही या अटीवर "असाधारण रजा " ऐवजी "अर्जित रजा" करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सकितांक २०२३०४१३१६५२५१६९०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


वाचा : आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |  akarik nondi marathi

वाचा : प्रगती पुस्तकातील नोंदी

वाचा : आकारिक मूल्यमापन गुण विभागणी

वाचा : आकारिक मूल्यमापनाची साधन तंञे

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html


🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇










Post a Comment

0 Comments