शाळापूर्व तयारी "पहिले पाऊल" ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत
![]() |
शाळापूर्व तयारी "पहिले पाऊल" ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत |
शाळापूर्व तयारी "पहिले पाऊल" ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/ रा.प्र.सं./ नि.भा./२०२३-२४/1192
प्रति,
१) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे.
२) मा. आयुक्त, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
३) मा. आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
४) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.
५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
६) शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
७) शिक्षण संचालक (माध्य व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, पुणे.
८) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, सर्व.
विषय:- "निपुण महाराष्ट्र - निपुण भारत" ह्या लक्षवेधी अभियानाच्या अंतर्गत शाळापूर्व तयारी "पहिले पाऊल" ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत.
शालेय शिक्षणाच्या सबलीकरणासाठी केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व निपुण महाराष्ट्र निपुण भारत अभियान अंतर्गत प्राथमिक स्तरावर सन २०२६ - २७ पर्यंत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यावर सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार आपण "निपुण महाराष्ट्र निपुण भारत" या अभियानातंर्गत वय वर्ष ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करतच आहात. सदर कार्यक्रमामध्ये शासन, ग्रामस्वायत समुदाय सहभाग, स्थानिक पातळीवर कार्यरत सामाजिक संस्था व ग्रामस्थ या मुख्य घटकांच्या समन्वयाने व पुढाकाराने मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत होण्यास मदत होत आहे. आपल्या मुलांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वाढीसाठी त्यांच्या पालकांचा हातभार लागल्यास मुलांना निपुण लक्ष गाठण्यास चांगली मदत होते याचा अनुभव आपण आपल्या मागील वर्षाच्या २०२२-२३ च्या "पहिले पाऊल" शाळापूर्व तयारी अभियानाच्या माध्यमातून घेतला आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात २०२३ - २४ साठी आपल्याला महाराष्ट्रातील इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी ह्या प्रत्येक दाखल पात्र मुलांना शाळापूर्व तयारी "पहिले पाऊल" महाराष्ट्रातील प्रत्येक वाडी वस्तीवर प्रभावीपणे राबविण्यासाठी आपल्या स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपले सहकार्य व सहभाग खूप महत्त्वपूर्ण आहे.
निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत शाळापूर्व तयारी पहिले पाऊल" आपल्या स्तरावरून सर्व जिल्ह्यातील सर्वच शाळात होणार असून सदर शाळापूर्व तयारी मेळाव्यात सर्व अधिकारी वर्ग यांनी सक्रीय सहभागातून माता गटांच्या सहभागातून पहिला मेळावा यशस्वीरित्या पारपडण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित तरी आपण ह्या शाळापूर्व तयारी मेळाव्याला भेटी देऊन, दाखल पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन माता-पालकांना, मुख्याध्यापक व गांवकरी यांना मार्गदर्शन करावे. शाळापूर्व तयारी मेळावा "पहिले पाऊल" यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी आपला सक्रीय सहभाग असणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे..
“पहिले पाऊल" - शाळापूर्व तयारी मेळावा.
१) यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरीय होणार्या शाळापूर्व तयारी प्रशिक्षण व मेळाव्यात सक्रीय सहभाग.
२) आपल्या क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी शाळापूर्व तयारी मेळावा व माता-पालकांना भेट देऊन संवाद साधने.
सर्व शाळांमधील शाळापूर्व तयारी पहिला मेळावा माहे एप्रिल २३ ते ३० या दरम्यान तसेच दुसरा मेळावा जून महिन्यात होईल यासाठी नियोजन करणे व "पहिले पाऊल" शाळापूर्व तयारी मेळाव्याला भेट - देऊन प्रत्येक मुल शाळेत दाखल करुण निपुण महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने उपरोक्त प्रमाणे आपले स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी..
कैलास पगारे, भा.प्र.से॰
राज्य प्रकल्प संचालक,
म.प्रा.शि.प. मुंबई.
🔰 स्टाॅल क्रमांक-1 नोंदणी
🔰 स्टाॅल क्रमांक-2 शारिरिक विकास
🔰 स्टाॅल क्रमांक-3 बौद्धिक विकास
🔰 स्टाॅल क्रमांक-4:- सामाजिक व भावनात्मक विकास
🔰 स्टाॅल क्रमांक-5:- भाषा विकास
🔰 स्टाॅल क्रमांक-6:- गणनपूर्व तयारी
🔰 स्टाॅल क्रमांक-7 :-समुपदेशन
विकासपत्र शाळा पूर्व तयारी डाऊनलोड करा.⬇️👇
वाचा : आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | akarik nondi marathi
वाचा : प्रगती पुस्तकातील नोंदी
वाचा : आकारिक मूल्यमापन गुण विभागणी
वाचा : आकारिक मूल्यमापनाची साधन तंञे
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments