राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांची उन्हाळी सुट्टीबाबत
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करणे तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणेबाबत.
शासन परिपत्रक :-
राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याची तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
२. त्यानुसार याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
५) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुटी जाहीर करण्यात येत आहे.
(२) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
३. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळा दरवर्षी दिनांक १५ जून रोजी व त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील व विदर्भ विभागातील शाळा दरवर्षी दिनांक ३० जून रोजी व त्यादिवशी सुटी आल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील.
8. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०४२०२००३३८८४२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
IMTIYAZ MUSHTAQUE KAZI
(इ.मु. काझी) सह सचिव, महाराष्ट्र शासन
वाचा : आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | akarik nondi marathi
वाचा : प्रगती पुस्तकातील नोंदी
वाचा : आकारिक मूल्यमापन गुण विभागणी
वाचा : आकारिक मूल्यमापनाची साधन तंञे
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments