Google Classroom प्रशिक्षण नोंदणी | Google Classroom Training | गुगल क्लासरूमचे ऑनलाइन प्रशिक्षण | zpps tech guruji
Google Classroom प्रशिक्षण |
प्रति,
• विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
• प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
• शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
• शिक्षणाधिकारी, प्राथमिक / माध्यमिक (सर्व)
• प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी (न.पा./ म.न.पा) (सर्व)
• शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम, दक्षिण, उत्तर).
विषय :- राज्यातील सर्व शिक्षकांनी गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी आवश्यक नावनोंदणी करणेबाबत...
संदर्भ :-
१. शासन पत्र संकीर्ण - २०२०/प्र.क्र.८७ / एसडी-६ दिनांक ०८ जून २०२०.
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रप/ गुगल क्लासरूम / २०२०-२०२१ दिनांक ११ जुलै २०२०
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला गेला. यानुसार संदर्भ क्रमांक २ अन्वये प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण ४०,००० शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी च्या व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्सचा यशस्वी व प्रभावी वापर शिक्षकांना करता येणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे "Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom" या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन माहे डिसेंबर २०२१ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. सदरच्या वेबिनारमध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच या प्रशिक्षण वेबिनारकरिता उपस्थित राहणेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याने प्रथमतः सर्व शिक्षकांनी https://maa.ac.in/googleclassroomtraining या लिंकवर अथवा सोबतचा QR कोड स्कॅन करून नाव नोंदणी करावी. या प्रशिक्षणांतर्गत सर्व शिक्षकांना मोफत G-suit आय. डी. तयार करून दिला जाणार असल्याने नोंदणी असलेल्या शिक्षकालाच सदरचा G-suit आय. डी. प्राप्त होईल, याची नोंद घ्यावी. सदर नावनोंदणी ही दि. २६ नोव्हेंबर, २०२१ शुक्रवार रात्री ११: ५५ वाजता बंद करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी.
तरी राज्यातील सर्व शिक्षकांना सदर प्रशिक्षणाचा लाभ घेता यावा यादृष्टीने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांना सदर वेबिनारसाठी वरील लिंकवर नावनोंदणी करणेसाठी सूचित करण्यात यावे तसेच वेबिनारचे सविस्तर वेळापत्रक यथावकाश निर्गमित केले जाईल.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
1 Comments
How to get I'd and password for Google classroom as I have attained both and completed both assignments
ReplyDelete