शाळा सिद्धी ऑनलाईन वेबिनार दि.२३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत | shala siddhi
शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orientation Programme च्या वेबिनारबाबत | शाळा सिद्धी ऑनलाईन वेबिनार- दि.२३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत
शाळा सिद्धी ऑनलाईन वेबिनार पहा. दि.२३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत👇
जा.क्र./राशैसंप्रपम /संकीर्ण/शासि/२०२१-२२/३८११ दि.१५/११/२०२१
प्रति,
१) उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व
२)प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद / मनपा, सर्व
४) शिक्षण निरीक्षक, दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई, पश्चिम मुंबई
५) प्रशासन अधिकारी, नगर परिषद, सर्व
विषय : शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orientation Programme च्या
वेबिनारबाबत.
संदर्भ :-
१) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र क्रं.जा.क्र. मप्राशिप/सशि/ गुणवत्ता / शालासिद्धी / २०२०-२१/५९४ दि.२३/०२/२०२१
२) या कार्यालयाचे पत्र जा. क्रं मराशैसंप्रप / शालासिद्धी/२०१९-२०/४७८४ दि.०६/१२/२०१९
३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दि.०७ जानेवारी, २०१७
४) शाळा सिद्धी, निपा, नवी दिल्ली यांचा ईमेल दि.२०/१०/२०२१
५) शाळा सिद्धी, निपा, नवी दिल्ली यांचा ईमेल दि. १६/११/२०२१
उपरोक्त संदर्भ ४ अन्वये शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orientation Programme च्या वेबिनारचे आयोजन करणेबाबत करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार सदर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दि. २३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
सदर ऑनलाईन वेबिनार करिता आपले अधीनस्त वरिष्ठ अधिव्याखाता. अधिव्याखाता, सर्व शाळांचे मुख्याध्यापक संदर्भ २ नुसार आपण नेमलेले शाळासिद्धी जिल्हा व तालुका नोडल अधिकारी, संदर्भ ३ अनुसार सर्व शाळासिद्धी निर्धारक या सर्वांना https://youtu.be/h_gM3pnOzHc या यू ट्यूब लिंक वर उपस्थित राहणे करिता आपल्या स्तरावरून आदेशित करावे.
सदर वेबिनारसाठी निपा नवी.दिल्ली यांचेमार्फत देण्यात आलेली https://forms.gle/Br1H8joTJQpcLaDF7 ही नोंदणी लिंक आपण स्वतः भरावी व आपले अधीनस्त वरिष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना ही लिंक प्रशिक्षणापूर्वी भरण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे.
ऑनलाईन वेबिनार करिता shaalasiddhi.niepa.ac.in या शाळासिद्धीच्या राष्ट्रीय वेब पोर्टल वर उपलब्ध खालील पुस्तिकांचे वाचन करण्याबाबत कळवण्यात यावे.
१. School standards and evaluation framework (शाळासिद्धी - शाळा मानके व मूल्यांकन आराखडा)
२. Guidelines for school evaluation (हिंदी, इंग्रजी माध्यम)
३. Guidelines for school external evaluation (हिंदी, इंग्रजी माध्यम)
४. School evaluation dashboard (हिंदी, इंग्रजी माध्यम)
५. Guidelines for uploading external report (हिंदी, इंग्रजी माध्यम)
तसेच एका शाळेचे पुनरावलोकन करण्यासाठी त्या शाळेने केलेल्या स्वयंमूल्यमापनाच्या डॅश बोर्डची प्रत वेबिनारकरिता सोबत ठेवावी,
स्थळ प्रत मा. संचालक याचेकडून अनुमोदित केली आहे.
0 Comments