Subscribe Us

Student Portal वरील मा. शिक्षणाधिकारी साहेब यांचा महत्त्वाचा संदेश | Important Message from Education Officer | आधार update

Student Portal वरील मा. शिक्षणाधिकारी साहेब यांचा महत्त्वाचा संदेश | Student Portal, Student database, आधार update,  zpps tech guruji, आधार नोंदणी, संच्यमान्यता 2021, sanchya manyata 2021, Studeny portal 

आधार नोंदणी, संच्यमान्यता 2021, zpps tech guruji
आधार नोंदणी, संच्यमान्यता 2021


🔰अत्यंत महत्त्वाचे :-

         राज्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची नोंद त्यांच्या आधार क्रमांकासह सरल प्रणालीमध्ये करणे बंधनकारक आहे. या संदर्भात आपल्याला यापूर्वी सुध्दा वेळोवेळी सूचना देण्यात आली आहे. हया नोंदीच्या आधारावरच संचमान्यता करण्यात येणार आहे, याची सुध्दा आपल्याला जाणीव आहे.

सर्व विद्यार्थ्यांची आधारसह नोंद न झाल्यास आपल्या शाळेतील काही शिक्षक अतिरिक्त होण्याचीही शक्यता आहे. तरीसुध्दा अजून आपल्यामार्फत १००% मुलांची अचूक आधार नोंदणी करण्यात आली नाही असे लक्षात आले आहे.

सरल प्रणालीमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या आणि प्रत्यक्ष आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचे दिलेल्या आकडेवारीवरुन दिसून येते. या बाबतचा तपशील पुढील तक्त्यात दर्शविला आहे.

शाळा लॉगीनमध्ये विद्यार्थीनिहाय माहिती उपलब्ध करून दिली आहे. असेही लक्षात आले आहे की, काही विद्यार्थ्यांच्या कोणतीही नोंद अभिलेखाशी जुळत (Match) नाही, ही फार गंभीर बाब आहे. सदर डेटा शासनामार्फत UIDAI (आधार ) डेटा बेसशी मॅच करण्यात येईल व अवैध आधार दिसल्यास, किंवा एकाच विद्यार्थ्यांची २ ठिकाणी नोंदणी केल्याचे आढळल्यास हा गुन्हा समजला जाईल याची नोंद घ्यावी. तरी खालीलप्रमाणे त्वरित कार्यवाही करावी -


1. ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सरल प्रणालीमध्ये केली आहे, मात्र आधार व सरल प्रणालीतील नोंदींमध्ये (entries ) तफावत आहे, ( उदा: नावात, जन्म तारिख, लिंग ) त्याची त्वरीत तपासणी करुन १००% चुका दुरुस्त करुन घेण्यात याव्यात.


2. तसेच ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सरल प्रणालीत अजूनही केलेली नाही त्यांची आधार क्रमांकाची नोंद सरल प्रणालीत त्वरीत अद्ययावत करावी. आपल्याला ही शेवटची संधी म्हणून नोटिस देण्यात येत आहे. यापुढे ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नाही, किंवा चुकीची नोंद आहे, दुबार नोंद आहे, किंवा अवैध आधार आहे, अशांना पटसंख्येत ग्राहय धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.आपल्या स्तरावरुन अचूक नोंदी करुन अवैध विद्यार्थी संख्या पटावरुन कमी करावी.

Student Portal संबंधी मार्गदर्शक व्हिडिओ आवश्य पहा.👇



तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती-NSP फाॅर्म कसा भरावा.

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.





Post a Comment

0 Comments