Subscribe Us

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 2022 | prajasattak din bhashan in marathi

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 2022 | prajasattak din bhashan in marathi




प्रजासत्ताक दिन वर मराठी भाषण 

Speech On Republic Day In Marathi – १

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपले मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका, आदरणीय शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो.

नमस्कार, माझे नाव………………………. मी इयत्ता…….. मध्ये शिकतो. आज मी आपल्या समोर २६ जानेवारी, म्हणजेच प्रजासत्ताक दिन निमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज स्वतंत्र भारताचा……… प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्त आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी पासून हे संविधान अंमलात आले. म्हणजे या दिवशी आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो.

आता प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय ? तर याचा अर्थ असतो कि लोकांचे, लोकांनी, लोकांकरिता चालवीत असलेले राज्य. प्रजासत्ताक देश म्हणजे असा देश कि ज्याचा मध्यबिंदू हा देशातील लोक असतात. या देशातील राष्ट्रप्रमुख किंवा पदाधिकारी हे सर्व जनतेमधून निवडणुकीद्वारे निवडले जातात. देशावर कुण्याही एका व्यक्ती किंवा घराण्याचे शासन नसून देशातील नागरिक तो देश चालवीत असतात.

नसे फक्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथ,

समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक,

गुलामगिरी संपली, झाले गणराज्य,

सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक

आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत यासाठी कितीतरी देशभक्तांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. आपल्याला हे स्वातंत्र्य एवढ्या सहजासहजी मिळालेले नसून यामागे शेकडो वर्षांचा स्वातंत्र्याचा लढा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली आहे. मंगल पांडे, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, मदनलाल धिंग्रा असे कितीतरी देशभक्तांनी स्वतःच्या प्राणांची आहुती या स्वातंत्र्य युद्धात दिलेली आहे.

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी,

अनेकांनी केले बलिदान.

वंदन तयांसी करुनिया आज,

गाऊ भारत मातेचे गुणगान.

अखेर जवळपास १५० वर्षांनी ब्रिटीशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. आता हा देश कुणाच्याही गुलामगिरीत नव्हता. मग या देशाचा कारभार चालविण्यासाठी आपल्याला संविधानाची गरज होती. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वारे तयार करून स्वीकारण्यात आले. परंतु २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निवडण्यात आला होता.

आजही आपले भारतीय जवान आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देत आहेत. आज आपण सुरक्षित आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या जवानांमुळे. आजही भारतावर कोणत्याही प्रकारची संकटे आली मग ती परकीय आक्रमण असो किंवा नैसर्गिक आपत्ती, यामध्ये सर्वात पुढे आपले जवान असतात.

जिक्र जब असली हिरो का होता है,

तो जुबां पर नाम देश के वीरो का होता है.

देशातील प्रत्येक जवानाला व त्यांच्या कर्तुत्वाला माझे शतशः नमन.

या दिवशी भारतीय राजधानी नवी दिल्ली येथे लालकिल्ल्यावर सकाळी मा. पंतप्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतो. नंतर संपूर्ण देशाला ते संबोधन करतात. यावेळी देशातील सर्व गणमान्य पाहुणे हजर असतात. मुख्य अतिथी म्हणून काही विदेशातील पाहुणे सुद्धा आपली हजेरी लावतात. नंतर विविध रंगारंग कार्यक्रमांना सुरुवात होते.

राजपथावर देशातील सर्व घटक राज्यांचे चित्ररथ निघतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन या चित्ररथांद्वारे घडविल्या जाते. भारतीय सैन्य दलाच्या सर्व तुकड्या आपल्या कवायती सादर करतात. यामध्ये वायुसेना आपले हवाई कौशल्य दाखवत उंच आकाशात चित्तथरारक उड्डाणे सादर करतात. एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांची सुद्धा कवायत येथे सादर केल्या जाते. यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पंतप्रधान भेटतात व त्यांच्या सोबत संवाद साधतात. पण फक्त दिल्लीतच नव्हे तर हे असे कार्यक्रम संपूर्ण देशभर साजरे केले जातात. सर्व शासकीय कार्यालयात ध्वजारोहण केले जाते. पोलीस विभागाकडून कवायत सादर केली जाते. यासोबतच गावागावांमधून प्रभातफेरी काढून भारत माता कि जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या जातात.

शहरातील चौका चौकात तरुण मंडळी देशभक्ती वरील गीते वाजवितात. कुणी गोड पदार्थ वाटप करतात, कुणी शरबत वाटप करतात तर कुणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना झेंडा लाऊन देत असतात. कुठे भाषण स्पर्धा तर कुठे वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या सर्वांमध्ये मला आवडणारी गोष्ट म्हणजे शाळेमधील प्रजासत्ताक दिन. २ दिवस अगोदर पासून सुरु होणारी तयारी. कुणी तोरणे बांधते, कुणी रांगोळी काढते, तर कुणी भाषणाची तयारी करतात. सर्वत्र अगदी रेलचेल असते.  ज्यांची नृत्य किंवा गायन असते ते विद्यार्थी आपला सराव करतात. कुणी मैदानावर उभे राहण्यासाठी व्यवस्थित ओळी आखत असतात.

प्रजासत्ताक दिनी अगोदर ध्वजारोहण होते. या नंतर राष्ट्रगीत गायन व प्रतिज्ञा म्हटल्या जाते. संविधानाचे वाचन होते. नंतर विद्यार्थी मित्रांची भाषणे, सामुहिक गीत गायन, नृत्य सादरीकरण होते. एन. सी. सी. व स्काउट गाईड चे विद्यार्थी सुंदर पथसंचलन करतात आणि शेवटी गोड पदार्थांचे वाटप होत असते.  मला खात्री आहे या गोष्टी सर्वांनी अनुभवलेल्या असतीलच.

अशा प्रकार एकदम हर्षोल्लासात देशाच्या कान्या कोपऱ्यात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा, आपल्या देशभक्तांचा आणि आपल्या देशातील प्रत्येक जवानाचा नेहमी आदर केला पाहिजे. ते होते म्हणून आज आपण हा कार्यक्रम साजरा करू शकत आहोत हे नेहमी लक्षात ठेवावे.

आज या पावन दिवशी आपण मला आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिल्या बद्दल मी आपले आभार मानतो. आपण सर्वांनी माझे दोन शब्द शांतता पूर्वक  ऐकून घेतले त्या बद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो.

जय हिंद, जय भारत……….. धन्यवाद!

हे पण वाचा ➡️ लेझीम डान्स दाखवा

हे पण वाचा ➡️ कवायत प्रकार माहिती

हे पण वाचा ➡️ सांस्कृतिक कार्यक्रम हिंदी गीत व्हिडिओ

हे पण वाचा ➡️ मराठी नाटक लिस्ट 

हे पण वाचा➡️ स्वागत गीत मराठी pdf 

हे पण वाचा➡️ सांस्कृतिक कार्यक्रम मराठी गीत

हे पण वाचा➡️ जिजाऊ जयंती भाषण प्रश्नमंजुषा

प्रजासत्ताक दिन वर मराठी भाषण 

Speech On Republic Day In Marathi – २

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,  माननीय प्राचार्य , आदरणीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो !

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, आज आपण आपल्या राष्ट्राच्या अतिशय खास प्रसंगी येथे जमलो आहोत, ज्याला प्रजासत्ताक दिन म्हणतात. प्रजासत्ताक दिनाच्या या महान निमित्ताने मला माझ्या प्रिय देशाबद्दल काहीतरी बोलण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो.

१५ ऑगस्ट १९४७ पासून भारत हा एक स्वराज्य देश आहे. १९४७ मध्ये १५ ऑगस्ट रोजी ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले, ज्याला आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. तथापि, २६ जानेवारीला आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली, म्हणून आम्ही हा दिवस प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. यावर्षी २०२१ मध्ये आम्ही भारताचा ... वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.

प्रजासत्ताकचा अर्थ असा आहे की,  देशात राहणाऱ्या लोकांच्या सर्वोच्च सामर्थ्यासाठी राजकीय नेते म्हणून लोकप्रतिनिधींची निवड करण्याचा आणि देशाला योग्य दिशेने नेण्याचा अधिकार फक्त लोकांनाच आहे. म्हणूनच, भारत एक प्रजासत्ताक देश आहे जेथे लोक पंतप्रधान म्हणून नेता निवडतात. आमच्या महान भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी भारतातील “पूर्ण स्वराज्या” साठी खूप संघर्ष केला.

आपल्या देशातील महान नेते आणि स्वातंत्र्यसेनानी म्हणजे महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लाला लाजपत राय, सरदार बल्लभभाई पटेल, लाल बहादुर शास्त्री इ. या लोकांनी भारत स्वतंत्र देश होण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात सातत्याने लढा दिला. त्यांनी आपल्या देशात केलेले समर्पण आपण कधीही विसरू शकत नाही. अशा महान प्रसंगी त्यांचे स्मरण करून त्यांचे आपण अभिवादन केले पाहिजे. केवळ या लोकांमुळेच आपण आपल्या मनाने विचार करू शकतो आणि कोणत्याही राष्ट्राशिवाय आपल्या देशात मुक्त राहू शकतो.

आपले पहिले भारतीय राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद होते, ते म्हणाले की, “राज्यघटना आणि संघटनेच्या अखत्यारीत आम्ही येथे राहणाऱ्या १२८ कोटी पुरुष व स्त्रिया असलेल्या या विशाल भूभागाची संपूर्ण जमीन एकत्रित केली आहे. त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो”. आपल्या देशात अजूनही आपण गुन्हे, भ्रष्टाचार आणि हिंसा लढा देत आहोत हे सांगणे किती लाजिरवाणी आहे. पुन्हा, देशाला अशा गुलामगिरीतून वाचविण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे कारण तो आपल्या देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या मुख्य प्रवाहातून परत खेचत आहे. पुढे जाऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, ग्लोबल वार्मिंग, असमानता इत्यादी सामाजिक विषयांविषयी आपण जागरूक असले पाहिजे.

डॉ. अब्दुल कलाम यांनी असे म्हटले आहे की, “जर एखादा देश भ्रष्टाचारमुक्त झाला आणि सुंदर मनांचा देश बनला तर मला असे वाटते की तेथे तीन मुख्य सदस्य आहेत.” तो एक पिता, आई आणि एक गुरु आहे. ” भारताचे नागरिक म्हणून आपण याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि आपल्या देशाला उन्नत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.

धन्यवाद.

जय हिंद, जय भारत!


प्रजासत्ताक दिन वर मराठी भाषण 

Speech On Republic Day In Marathi – 3

प्रजासत्ताक दिवस हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.

हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ठिकठीकाणी प्रभातफेर्‍या भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविणार्‍यांचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोशनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ हि वाटला जातो. मुले हि आनंदित होतात.

शाळांना तोरणे-पताका, तिरंगी ध्वज लावली जातात. लहान मोठी मुले तिरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात  घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात. सर्व विद्यार्थी अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण  केले जाते. शाळेतील एन. सी. सी. व स्काउट चे विद्यार्थी सुंदर संचलन करतात. शाळेतील वाद्य -वृंदा वरही राष्ट्रीय गाणी वाजविली जातात. तसेच मुले मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीते गातात. भाषणे करतात, नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतात. मुख्याध्यापका कडून गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक होते व त्यांना सम्मान पत्रे दिली जातात.

या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस ! लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस ! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतीज्ञा केलीच पाहिजे, आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे  प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र प्रेम अधिक उसळून, उजळून निघते.

प्रजासत्ताक दिन वर मराठी भाषण 

Speech On Republic Day In Marathi – 4

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,  माननीय प्राचार्य , आदरणीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो !

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, आज आपण आपल्या राष्ट्राच्या अतिशय खास प्रसंगी येथे जमलो आहोत, ज्याला प्रजासत्ताक दिन म्हणतात. प्रजासत्ताक दिनाच्या या महान निमित्ताने मला माझ्या प्रिय देशाबद्दल काहीतरी बोलण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो.

आदरणीय मुख्याध्यापक, माझे शिक्षक, माझे वरिष्ठ आणि वर्गमित्र ! या खास प्रसंगाबद्दल मी तुम्हाला काही माहिती देतो. आज आपण सर्वजण आपल्या राष्ट्राचा ...... वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजेच अडीच वर्षांनंतर १९५० मध्ये त्यांनी भारताचा प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करण्यास सुरवात केली. आपण प्रत्येक वर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो, कारण या दिवशी भारतीय संविधान अस्तित्वात आले. १९४७  मध्ये ब्रिटीशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत हा स्वराज्य देश नव्हता म्हणजे सार्वभौम राज्य नव्हते. १९५० मध्ये त्याची राज्यघटना अस्तित्त्वात आली तेव्हा भारत एक स्वराज्य शासित देश बनला.

भारत हा लोकशाही देश आहे. येथे राज्य करण्यासाठी राजा किंवा राणी नसलेले लोक येथे सत्ताधीश आहेत. या देशात राहणार्‍या प्रत्येक नागरिकाला समान हक्क आहेत, आमच्या मताशिवाय कोणीही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकत नाही. देशाला योग्य दिशेने नेतृत्व देण्यासाठी आपला सर्वोत्तम पंतप्रधान किंवा इतर कोणी नेता निवडण्याचा आम्हाला अधिकार आहे. आपल्या देशाच्या बाजूने विचार करण्याइतके कौशल्य आमच्या नेत्याकडे असले पाहिजे. त्याने देशातील सर्व राज्ये, खेडे व शहरे याबद्दल समान विचार केला पाहिजे जेणेकरून कोणत्याही जातीभेद, धर्म, गरीब, श्रीमंत, उच्चवर्ग, मध्यमवर्गीय, निम्न वर्ग, अशिक्षित इत्यादी विचारांशिवाय भारत एक सुविकसित देश बनू शकेल.

आमचे नेते देशाच्या बाजूने प्रबळ स्वभावाचे असले पाहिजेत जेणेकरुन प्रत्येक अधिकारी सर्व नियमांचे योग्य प्रकारे पालन करू शकेल. हा देश भ्रष्टाचारमुक्त देश होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी भारतीय नियम व कायद्यांचे पालन केले पाहिजे. केवळ “विविधतेत एकता” असलेला भ्रष्टाचारमुक्त भारत हा आपला खरा देश असेल. आमच्या नेत्यांनी स्वत: ला विशेष व्यक्ती म्हणून विचार करू नये कारण ते आपल्यातील एक आहेत आणि त्यांची नेमणूक त्यांच्या देशाच्या क्षमतानुसार केली जाते. मर्यादित अंतरासाठी आपली खरी सेवा देण्यासाठी आम्ही निवडले आहे. म्हणून त्यांचे महत्त्व आणि सत्ता आणि कार्यालय यांच्यात कोणतीही कोंडी होऊ नये.

भारतीय नागरिक म्हणून आपण आपल्या देशाबद्दलही पूर्णपणे जबाबदार आहोत. आपण स्वत: ला नियमित केले पाहिजे, बातम्या वाचल्या पाहिजेत आणि देशात घडणाऱ्या घटना, काय योग्य व अयोग्य घडत आहे, आपले नेते काय करीत आहेत आणि सर्वप्रथम आपण आपल्या देशासाठी काय करीत आहोत याविषयी जागरूक असले पाहिजे. पूर्वी, भारत हा ब्रिटिश राजवटीतील गुलाम देश होता आणि त्याने आपल्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाद्वारे बर्‍याच वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळवले. म्हणूनच आपण आपल्या सर्व बहुमोल त्यागांना सहजपणे जाऊ देऊ नये आणि पुन्हा भ्रष्टाचार, अशिक्षितपणा, असमानता आणि इतर सामाजिक भेदभावांचा गुलाम होऊ देऊ नये. आजचा सर्वोत्तम दिवस आहे जेव्हा आपण आपल्या देशातील खरा अर्थ, प्रतिष्ठा आणि सर्वात महत्वाची संस्कृती टिकवण्याचा संकल्प केला पाहिजे.

धन्यवाद, जय हिंद, जय भारत !




🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.




Post a Comment

0 Comments