Subscribe Us

2014-15 पासून प्रलंबित असलेल्या संचमान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत | zpps tech guruji

2014-15 पासून प्रलंबित असलेल्या संचमान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत | zpps tech guruji 


संचमान्यता ऑफलाईन पध्दतीने
संचमान्यता ऑफलाईन पध्दतीने 

शुद्धीपत्रक 

क्रमांक: आशि/2021/ संचमान्यता/आस्था क144/ 1116

दिनांक : 23.02 2022 


विषय सन :- 2014-15 पासून प्रलंबित असलेल्या संचमान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत.

संदर्भ शिक्षण आयुक्तालयाचे परिपत्रक क्र. आशि/2021 / संचमान्यता / आस्था क 144/5026 दि. 29.11.2021 

संदर्भीय परिपत्रक दि. 29.11 2021 मधील कार्यपध्दती ही केवळ मूल्यांकनासाठी सादर करावयाच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने नसून सन 2014-2015 या वर्षापासून प्रलंबित असलेल्या सर्व शाळांच्या ऑफलाईन संच मान्यता संदर्भीय परिपत्रकातील तरतुदीप्रमाणे सन 2019-20 पर्यंत करण्याबाबतही आहेत. तसेच खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

1) संदर्भाधीन परिपत्रकातील निर्देशानुसार मूल्यांकनाच्या शाळांसह प्रलंबित असलेल्या अन्य शाळांच्या संच मान्यताही सन 2012-13 आणि 2013-14 च्या संच मान्यतेतील पायाभूत पदे ग्राहय धरून त्यापुढील संच मान्यता ऑफलाईन दुरुस्त करता येतील.

2) अनुदानित शाळांच्या प्रलंबित संच मान्यता करताना त्या त्या मागील वर्षी मंजूर असलेल्या पदांच्या मर्यादित पदे मंजूर करावीत 

2.) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी त्यांचे स्तरावरुन संच मान्यता निर्गमित करताना नोंदवहीमध्ये नोंद करुनच संबंधित शाळांना द्याव्यात.

3) संच मान्यता प्रलंबित असलेल्या कारणांचा शोध घेऊन अशा शाळांच्या ऑनलाईन संच मान्यता करण्यात याव्यात, ऑनलाईन संच मान्यता झाल्यानंतर ऑफलाईन करण्यात आलेली संच मान्यता आपोआप रद्द झाल्याचे समजण्यात येईल.

4) सर्व शाळांना ऑफलाईन पध्दतीने संच मान्यता देताना संदर्भाधीन परिपत्रकातील याआधी दिलेल्या सूचना/निर्देश लागू राहतील.

(5) संदर्भीय परिपत्रकातील अ.क्र.5 मधील शेवटच्या ओळीतील अनुदानित हा शब्द वगळण्यात येत आहे. शासन पत्र दि.25.06.2020 व 02.11 2020 नुसार अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांसाठी विचारात घेण्यात यावे.

(विशाल सोळंकी, भा.प्र.से.) 

आयुक्त, शिक्षण

शिक्षण आयुक्तालय, पुणे-1


✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ संचमान्यता 2021-22 माहिती कशी भरावी


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.



Post a Comment

0 Comments