Subscribe Us

शिवाजी महाराज पोवाडा डाउनलोड mp3 | shivaji maharaj powada download mp3 | zpps tech guruji

शिवाजी महाराज पोवाडा डाउनलोड mp3 | shivaji maharaj powada download mp3 | zpps tech guruji 






Song Credit

SONG TITLE : Shivaji Maharaj Powada
LYRICS :
SINGER : Nandesh Umap
MUSIC : Ajit, Sameer and Atul
MOVIE : Me Shivajiraje Bhosale Boltoy

Shivaji Maharaj Powada Lyrics In Marathi

महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती

महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम

याला कोण घालिल येसन, दरबारी पुसती बेगम

बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का!

नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार,

कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार,

इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला

हम लायेंगे शिवाजी को, अन त्याने विडा उचलला

नाव त्याच अफजलखान …(X २) 

जिता जागता जणू शैतान

खान बोलला छाती ठोकून,

शिवबाला टाकतो चिरडून

मरहबा, सुभानअल्लाह

कौतिक झाले दरबारात

खान निघाला मोठ्या गुरमित

त्याच घोडदल पायदळ

फौजा फाटा लई बक्कल

अंगी दहा हत्तीच बळ, 

पाहणारा कापे चळचळ

वाटेत भेटेल त्याला चिरडीत,

ठेचीत खानाची सेना निघाली

गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली

आया बहि‍णींची आब्रू लुटली

कोण कोण रोखणार हे वादळ 

आता शिवबाच काही खर नाही

इकडे निजाम, तिकडे मोगल

पलीकडे इंग्रज, जो ते हेच बोलू लागला

राज्याची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार

काय लडवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार

अश्या वाघिणीचा तो छावा…. (X २) 

गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा

भेटीचा धाडला सांगावा, प्रतापगडावर,

प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानान

हसत हसत कबूल केला, दिवस ठरला …

दिवस ठरला, आणि ठरल्या प्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान …(X ३)

आला बेगुमान नाही त्याला जाण

शिवाजी राजाच्या करामतिची…..(X २)

अन त्यास नाही जाणीव शक्तिची……(X २)

अन करील काय कल्पना युक्तिची

हा जी जी जी …(X३)

खानाच्या भेटीसाठी …(X २)

महाराजानी एक शानदार शामियाना उभारला होता

भेटीसाठी छान उभारीला

नक्षीदार शामियान्याला

अन अशा ह्या शामियान्यात

खान डौलत डुलत आला …(X २)

सय्यद बंडा त्याच्या संगतीला

शिवबाच्या संगती महाला

राजाला पाहून खान म्हणतो आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ

खान हाक मारीतो हसरी …(X २)

रोखून नजर गहिरी

जी र जी जी …

खानान राजाला आलिंगन दिल

अन दगा केला

खान दाबी मानी मान्याला …(X २) 

कट्यारीचा वार त्यान केला …(X २)

खर खर आवाज झाला

चिलाखत व्हत अंगाला

खानाचा वार फुका गेला

खान गडबडला

इतक्यात महाराजानी

पोटामधी पिसवा ढकलला

वाघनखांचा मारा केला टरटरा फाडल पोटाला

हे तडा गेला खानाचा कोथळा

बाहिर आला जी र जी जी …(X३)


💥 आपणास हे ही आवडेल - शिवजयंती 2022 प्रश्नमंजुषा मराठी

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.




Post a Comment

0 Comments