डॉक्टर सी व्ही रामन यांची माहिती | Cv raman information in marathi
28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी भारतातील रामन परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवला होता. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.
त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) या शोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाले होते.
पूर्ण नाव : चंद्रशेखर वेंकट रामन्
जन्म :- नोव्हेंबर ७, १८८८
तिरुचिरापल्ली,तामिळनाडू, भारत
मृत्यू :- नोव्हेंबर २१, १९७० (८३ व्या वर्षी)
बंगळूर, कर्नाटक, भारत
निवासस्थान :- भारत
नागरिकत्व :- भारतीय
राष्ट्रीयत्व :- भारतीय
धर्म :- हिंदू
कार्यक्षेत्र :- भौतिकशास्त्र
कार्यसंस्था :- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
प्रशिक्षण :- प्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई
डॉक्टरेटकरता विद्यार्थी : जी.एन्. रामचंद्रन्
ख्याती :- रामन् परिणाम
वडील :- चंद्रशेखर अय्यर
आई :- पार्वती
पत्नी :- लोकासुंदरी
अपत्ये :- चंद्रशेखर, राधाकृष्णन
सन्मान आणि पुरस्कार :
कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात (१९२४) आणि किताबधारी व्यक्ती म्हणून १९२९ मध्ये रामन यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले.
१९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक
१९४१ मध्ये फ्रॅंकलिन पदक
१९५४ मध्ये भारतरत्न पुरस्कार
१९५७ मध्ये लेनिन शांतता पुरस्कार.
१९९८ मध्ये अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टव्हेशन ऑफ सायन्स यांनी सी.व्ही, रामन यांच्या आविष्कारावर आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक केमिकल लॅंडमार्क म्हणून शिक्कामोर्तब केले.
भारतीय वैज्ञानिकांत डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन यांचे स्थान विशेष आहे. भौतिकशास्त्रातील विशेष कार्याबद्दल जगातील विज्ञानासाठी असणारा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला. तामिळनाडू राज्यातील त्रिचनापल्ली येथे ७ नोव्हेंबर १८८८ रोजी रामन यांचा जन्म झाला. मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. पदार्थविज्ञान या विषयात त्यांना पदवी परीक्षेत ‘एनी’ सुवर्ण पदक मिळाले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ‘ध्वनीलहरी’ वर एक शोधनिबंध लिहिला. तो लंडनच्या ‘फिलॉसॉफिकल मेगेझीन’ या प्रसिद्ध नियतकालिकाने प्रसिद्ध केला तर दुसऱ्या वर्षी त्यांनी प्रकाशावर निबंध लिहिला व तो नेचर या नियतकालिकाने प्रसिद्ध केला. १९०७ साली ते एम. ए. ची परीक्षा प्रथम वर्ग आणि सर्व प्रथम येऊन उत्तीर्ण झाले. तर वयाच्या अठराव्या वर्षी भारत सरकारची अर्थखात्याची स्पर्धा परीक्षा पास झाले व त्यांची असिस्टंट अकाऊंट जनरल म्हणून कोलकत्यास नेमणूक झाली.
सी.व्ही रामन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला आणि या खनिजांच्या प्रकाश-विकिरणाच्या गुणधर्मांंचा अभ्यास केला. यासाठी त्यांना काही साहित्य देशभरातून व विदेशातून भेट म्हणून मिळाले. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी सी.व्ही रामन अनेकदा लहान हाताळण्याएवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असत.
हिंदू तमिळ ब्राह्मण पालकांच्या पोटी जन्मलेला रमण हा एक अनमोल मुलगा होता. त्याने सेंट अलॉयसियसच्या अँग्लो-इंडियन हायस्कूलमधून अनुक्रमे ११ आणि १३ वर्षांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १६ व्या वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्रात सन्मानाने त्यांनी मद्रास विद्यापीठात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. पदवीधर विद्यार्थी असताना १९०६ साली त्यांचा पहिला संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आला. पुढच्या वर्षी त्यांनी एम.ए. ची पदवी मिळवली. कोलकाता येथील इंडियन फायनान्स सर्व्हिसमध्ये असिस्टंट अकाउंटंट जनरल म्हणून रुजू झाले तेव्हा ते १९ वर्षांचे होते. तेथे त्यांची इंडियन असोसिएशन फॉर द अप्लाइन्शन ऑफ सायन्स (आयएसएस) या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेशी ओळख झाली, ज्यामुळे त्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळाली आणि ध्वनी आणि ऑप्टिक्समध्ये त्यांनी मोठे योगदान दिले.
१९१७ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात आशुतोष मुखर्जी यांनी त्यांना भौतिकशास्त्राचे पहिले पालित प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून त्यांना समुद्राच्या निळ्या रंगाचे वर्णन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी १९२६ मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली. त्याने आणि कृष्णन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली, ज्याला त्यांनी "सुधारित विखुरणे" असे संबोधले, पण त्याला रामन इफेक्ट म्हणून ओळखले जाते. भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. रमण १९३३ साली बेंगळुरूयेथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये पहिले भारतीय संचालक बनले. तेथे त्यांनी त्याच वर्षी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसची स्थापना केली. त्यांनी १९४८ साली रामन रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली. तेथे त्यांनी शेवटच्या काळात काम केले.
नोकरी करत असताना कोलकत्यातील भारतीय विज्ञान संवर्धन संस्थेत ते वैज्ञानिक संशोधन करू लागले. त्यांचे शोधनिबंध अनेक शास्त्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध होऊ लागले. १९१७ साली कोलकता विद्यापीठाने पदार्थविज्ञानाचे एक अध्यासन सुरू करून रामन यांची त्यावर नेमणूक केली. १९२१ झाली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झालेल्या शास्त्रज्ञांच्या जागतिक परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९२४ च्या कॅनडामधील परिषदेसाठी ही ते हजर राहिले. तेथे त्यांनी ‘रेणू मुळे होणारे प्रकाश विवर्तन’ या विषयावर व्याख्यान दिले. यासाठी त्यांनी बोटीने प्रवास केला व प्रवासात सागराचे निरीक्षण करून समुद्राच्या रंगावर एक शोधनिबंध लिहिला. “आकाशाचा रंग व समुद्राचा रंग या दोन स्वतंत्र घटना आहेत व प्रकाश किरण पाण्यातून जात असताना त्यांचे विवर्तन होते’ असा सिद्धांत मांडला. पाण्यात तरंगणाऱ्या विविध कणांमुळे व पाण्याच्या रेणू मुळे प्रकाशाचे विवर्तन होते, त्यामुळे पाण्यात निरनिराळे रंग दिसतात असे त्यांनी सांगितले.
विवाणुमुळे (molecules) मुळे होणारे किरण विवर्तन (scattering) हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. यामुळे त्यांना जागतिक किर्ती प्राप्त झाली व इंग्लंड, अमेरिका, रशिया, जर्मनी · इत्यादी देशात त्यांना व्याख्यानासाठी पाचारण करण्यात आले. प्रकाश या विषयावरील त्यांचे संशोधन महत्त्वाचे असून १९२८ साली त्यांनी प्रकाशशास्त्रा वरील जगप्रसिद्ध सिद्धांत जाहीर केला. वेगवेगळ्या माध्यमातील विवाणुमुळे प्रकाश किरणांची लांबी बदलते व प्रकाश लहरींची मूळची लांबी व बदललेली लांबी मोजणे शक्य असते. जर विवाणुमुळे हे विवर्तन होते तर वस्तू मधील विवाणुरचनेचा हा परिणाम होय. म्हणजेच विवर्तीत लहरींच्या लांबी वरून पदार्थातील विवाणुची रचना समजणे शक्य होते. ‘विवाणुमुळे विवर्तन होते, त्यानंतरच प्रकाश लहरींची लांबी बदलते. या सिद्धांताला रामन परिणाम (Raman effect) असे म्हणतात. या शोधाबद्दल त्यांना १९३० सालचे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. या शोधामुळे शास्त्रज्ञांना स्फटिकांच्या अंतर रचनेचा व विवाणुच्या रचनेचा शोध घेता येऊ लागला. डॉ. रामन यांनी हे संशोधन २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी जाहीर केले. पुढे त्यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी १९८७ रोजी साजरा करण्यात आला होता. प्रकाशकिरण अत्यंत सूक्ष्म कणांवर पडल्या नंतर सर्व दिशांना विखुरण्याच्या क्रियेला प्रकाशाचे ‘विकिरण’ म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना सूर्यप्रकाशाच्या होणाऱ्या विकिरणामुळे आकाश निळे दिसते. सर्वांत कमी तरंग लांबी असणाऱ्या निळ्या रंगाचे जास्त प्रमाणात विकिरण होऊन विकिरण झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांना दिसल्याने आकाश निळे भासते. तथापि, आकाशाच्या निळ्या रंगाच्या परावर्तनामुळे समुद्राचे पाणी निळे दिसते, असे पूर्वी समजले जात असे. यावरही रामन यांनी पाणी आणि बर्फामधून होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणांचा अभ्यास करून समुद्राच्या निळाईचे कारण प्रकाशाचे पाण्याच्या रेणूमुळे होणारे विकिरणच असल्याचे सिद्ध करून दाखविले. या संशोधनानंतर प्रकाशाच्या विकिरणाच्या आण्विक प्रक्रिये संबंधी, रचनेविषयी भांडार खुले झाले. रासायनिक संयुगाची रचना ठरविण्यामध्ये रामन परिणामाची मोलाची मदत झाली.
हिऱ्यांवर संशोधन :- नोबेल पारितोषिकाच्या रकमेतून त्यांनी संशोधनासाठी हिरे खरेदी केले. हिर्यामधील परमाणु एका विशिष्ट पद्धतीने दोलायमान होतात व त्यामुळे एक वेगळाच वर्णपट तयार होतो असा त्यांनी शोध लावला. हिरा व कोळसा एकाच घटका पासून निर्माण झाले असून त्यांच्या अणूंच्या अंतरंगातील वेगळेपणामुळे दोन्ही भिन्न गुणधर्म दाखवितात. वेगवेगळ्या प्रकारच्या दगडावर अतिनील किरण टाकले असता, अंधारात त्या दगडावर किती प्रकारचे विविध रंग आहे हे त्यांना दिसून आले. साधे दगड त्या किरणांनी प्रकाशमान होतात यालाच ‘विभासना’ असे म्हणतात हे त्यांनी सांगितले. रामन यांचे शोध भौतिकशास्त्र व ध्वनी शास्त्राशी संबंधित आहेत. चुंबकीय शक्ती, क्ष-किरण, सामुद्रिक रंग व ध्वनी यावरील त्यांचे संशोधन उल्लेखनीय आहे.
१९३३ साली बेंगलोरु मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेचे ते संचालक होते तर १९४३ मध्ये बेंगलोरु मध्ये त्यांनी आणखी एक वैज्ञानिक संस्था ‘रामन रिसर्च इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. डॉ. होमी भाभा व डॉ. विक्रम साराभाई हे या संस्थेचे विद्यार्थी. ‘इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स’ या संस्थेने रामन यांना १९४४ व १९४९ असे दोन वेळा अध्यक्षपद बहाल केले. ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ ही पदवी तर भारत सरकारने १९५४ साली त्यांना ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च मानाची पदवी बहाल केली. विज्ञानाचा उपयोग शांततेसाठी व जनकल्याणासाठी करावा असे त्यांचे मत होते या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली त्यांना शांतता पुरस्कार देण्यात आला.. वयाच्या ८३ व्या वर्षी २१ नोव्हेंबर १९७० ला हे थोर शास्त्रज्ञ दिवंगत झाले.
0 Comments