परिवर्तित रजा meaning | parivartit raja | maharashtra nagari seva raja niyam
![]() |
परिवर्तित रजा meaning | parivartit raja |
परिवर्तित रजा meaning, parivartit raja, maharashtra nagari seva raja niyam
परिवर्तीत रजा नियम ६१
ही रजा वैद्यकीय प्रमाणपत्रावर खालील अटींच्या अधीन राहून मंजूर केली जाते :
१) कर्मचारी कामावर परत येण्याची रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याची खात्री पटली पाहिजे.
२) पूर्णवेतनी रजेच्या स्वरुपात मंजूर केली जाते.
३) दुप्पट दिवस अर्धवेतनी रजेच्या खाती खर्ची टाकले जातात.
४) कर्मचारी सेवेत परत न आल्यास या रजेचे रुपांतर अर्धवेतनी रजेत केले जाते व अति प्रदानाची रक्कम वसूल करण्यात येते.
५) अपवाद - खालील प्रकरणी ही रजा मंजूर करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसते.👇
१) प्रसुती रजेला जोडून ६० दिवसांच्या मर्यादेपर्यंत, बालसंगोपनासाठी
२) लोकहितास्तव उच्च अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ९० दिवसांपर्यंत.
३) विपश्चनेसाठी १४ दिवसांपर्यंत, तीन वर्षातून एकदा / संपूर्ण सेवेत ६ वेळा
४) शिक्षक संवर्गासाठी त्यांना प्रत्येक सहामाहीत त्यांना अनुज्ञेय १० दिवस. अर्धवेतनी रजेएवढी ५ दिवस पूर्ण वेतनी रजा शासन निर्णय दि. ६ / १२ / ९६ प्रमाणे घेता येईल. मात्र या रजेस अर्जित रजा असे संबोधले आहे.
६) रजा वेतन :- अर्जित रजेवर गेल्यावर मिळते त्याचदराने म्हणजे पूर्ण दराने रजा वेतन अनुज्ञेय राहील.
0 Comments