अर्जित रजा नियम pdf | महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 pdf
![]() |
अर्जित रजा नियम |
अर्जित रजा नियम pdf,
महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 pdf
१) प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या १ तारखेस प्रत्येकी १५ दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये ही रजा जमा केली जाते.
२) ही रजा ३०० दिवसांच्या कमाल मर्यादेपर्यन्त साठविता येते. ३०० दिवस झाल्यावर पुढील सहामाहिच्या सुरुवातीला १५ दिवस अनुज्ञेय असतात पण, ३०० + १५ असे दाखवावे व घेतलेली रजा प्रथम १५ दिवसातून वजा करावी व ३०० पेक्षा जास्त शिल्लक राहिल तेवढे दिवस व्यपगत होतील. मात्र एकाच वेळी सलग १८० दिवसापर्यंतच ही रजा मंजूर करता येते.
३) प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला अडीच दिवस दराने ही रजा जमा केली जाते.
४) सेवेचा कॅलेंडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावयाचा असतो.
५) असाधारण रजा / अकार्य दिन / निलंबन या कालावधीसाठी १/१० या दराने ही रजा कमी केली जाते. मात्र १५ दिवसापेक्षा जास्त कपात करता येणार नाही.
६) रजेचे दिवस अपूर्णांकात असल्यास ते पुढील दिवसांशी पूर्णांकित केले जातात.
७) ही रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते.
८) शक्यतोवर परिशिष्ट ५ मधील नमुना १ मध्ये या रजेसाठी अर्ज करावयाचा असतो.
९) रजा वेतन :- रजेवर जाण्यापूर्वीच्या दिवशी ज्या दराने वेतन अर्हरीत केलं त्याच दराने संपूर्ण रजा काळात रजा वेतन मिळेल. वेतनवाढ जरी रजा काळात आली तर वेतनवाढ मिळते परंतु प्रत्यक्ष लाभ रजा संपवून हजर झाल्यावर मिळेल.
0 Comments