Subscribe Us

शिक्षक दिन मराठी भाषण | Shikshak Din Marathi Bhashan

शिक्षक दिन मराठी भाषण | Shikshak Din Marathi Bhashan


शिक्षक दिन मराठी भाषण, Shikshak Din Marathi Bhashan

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महोदय पूज्य गुरूजनवर्ग आणि माझे प्रिय वर्ग मित्र या सर्वांना माझा नमस्कार !

आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. आज मी तुम्हाला शिक्षण दिनी भाषण सांगणार आहे. तुम्हा सर्वांना शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या शिक्षकांना आदर देण्यासाठी आपण दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो याची सुरुवात १९६२ मध्ये झालेले कारण की या दिवशी आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. एक सक्षम शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती हा दिवस सर्व शिक्षक शिक्षकांसाठी शिक्षक दिन म्हणुन साजरा करून सन्मान दिला जातो.

शिक्षक हा देशाचा आणि समाजाचा अभिमान मानला जातो. विकसित आणि प्रगतीशील देशासाठी येणाऱ्या पिढीला योग्य शिक्षण देऊन योग्य पिढी तयार करणारा एकमेव व्यक्ती शिक्षक असतो. शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला उच्च शिखरावर नेण्यासाटी आपले ज्ञान वाढवत असतो. मुलांसाठी तो चांगला मार्गदर्शक ठरू शकेल असा त्याचा नेहमी प्रयत्न असतो.

प्रत्येक मोठा राजकारणी, कलाकार, डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनीयर, शेतकरी, सैनिक इत्यादी व्यक्तीच्या मागे शिक्षकांच्या मेहनतीचे फळ असते. बलाढ्य आणि विकसनशील देशाचा शिक्षक महत्त्वाचा भाग असतो. सर्व देशांमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. सर्व देशांमध्ये शिक्षक दिन साजरा करण्याचा उद्देश शिक्षकांचा योग्य सन्मान करणे आणि शैक्षणिक क्षेत्रात मिळालेल्या सर्व कामगिरीची प्रशंसा करणे आहे.

प्रत्येक मुलाच्या शिस्त आणि चारित्र्य घडवण्यात शिक्षकांचा हात असतो आणि केवळ शिस्त आणि चरित्र हेच राष्ट्राचे बलस्थानं बनते. माझ्या सर्व सहकारी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा ! ऐवढे बोलून मी माझे भाषण संपवतो,,, जय हिंद, धन्यवाद.🙏🙏


वाचा - sarvepalli radhakrishnan information, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती

वाचा - शिक्षक दिन केव्हा असतो, शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो 

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇









Post a Comment

0 Comments