Subscribe Us

marathwada mukti sangram din bhashan marathi | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण-2

marathwada mukti sangram din bhashan marathi | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण-2


marathwada mukti sangram din bhashan marathi, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण-2

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महोदय पूज्य गुरूजनवर्ग आणि माझ्या प्रिय वर्ग मित्रांनो या सर्वांना माझा नमस्कार !

आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. तुम्हा सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

समोर होता एकच तारा

अन पायतळी अंगार !

अशा ध्येयधुंद भावनांनी ज्यांनी हैद्राबाद मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला, हौतात्म्य पत्करले. अशा सर्व ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यसेनानी ,वीरांगनाना ही  शब्दरूप आदरांजली.....

'स्वप्ने पडली उष:काळाची

हाती मात्र अंध:कार

देश सारा उजळला जरी

मराठवाड्याची काजळ रात'

दिवस १५ ऑगस्ट १९४७ चा साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबाद संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नव्हते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला मराठवाडा पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच.

 परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेटाचा प्रयत्न  हा कौतुकाचा खराच; पण स्वातंत्र्यानंतरही आणखी एका स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल? हैद्राबाद हे भारतातील एक मोठे संस्थान होते. स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टाहास होता. तेलगु, मराठी, कन्नड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता. निजामाच्या जुलुमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते; म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. त्यातच  निजामाचे पाठबळ असलेला कासीम रझवी याने आपल्या 'रझाकार' या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरु केले.

'रण पेटले पेटले रण

अग्निज्वाला सर्वदूर

अंगार मनामनात

झुगारु हा अंकुश'

जनमताचा प्रक्षोभ उसळला . खेडी, शहर, निजामाविरुद्ध खदखदू लागली; आणि याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिले, स्वामी रामानंद तीर्थ यांनी. १९३८ मध्ये स्थापन झालेल्या हैद्राबाद स्टेट कोंग्रेसकडे याचे नेतृत्व आले. लढा घराघरात पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे सेनानी उभे राहिले. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, पुरषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, श्रीनिवासराव बोरीकर, किशोरभाऊ शहाणे यांनी हे स्फुलिंग चेतवले. या लढ्यात स्त्रियाही काही मागे नव्हत्या .आशाताई वाघमारे, करुनाबेन चौधरी, सुशीलाबेन दिवान यांची नावे आपल्याला घेता येतील. वेदप्रकाश श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक यासारख्या कित्येक  स्वातंत्र्यसेनानीनी 'वंदे मातरम' चळवळी अंतर्गत निजाम सरकारविरुद्ध आपला रोष  व्यक्त केला.

'मुक्तीचा आक्रोश आमुचा

स्वातंत्र्य आम्हा पाहिजे

ध्यास एक श्वास एक

हेच आमुचे ध्येय असे'

भारत सरकारमध्ये सामील होण्याची तेथील लोकांची तीव्र इच्छा, त्याचे उठणारे तीव्र पडसाद, लोकांवर होणारा अमानुष अत्याचार या सगळ्याविरुद्ध 13 सप्टेंबर १९४८रोजी भारत सरकारने हैद्राबाद संस्थाना विरुद्ध कारवाई केली .इ.स.१२९४ मध्ये मराठवाडा इस्लामी राजवटीचा आरंभ झाला. 17 सप्टेंबर १९४८ ला या संस्थानाच्या वीलीनीकरणाने त्या राजवटीचा अंत झाला. समान संस्कृती व समान भाषा बोलणाऱ्या आप्तांना लोकशाही राज्यात म्हणजे महाराष्ट्रात मराठवाडा विलीन झाला, त्यासाठी 1 नोव्हेंबर 1956  या दिवसाची वाट पहावी लागली.

वाचा - marathwada mukti sangram din bhashan marathi, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण-3

वाचा - marathwada mukti sangram din bhashan, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन-1

वाचा - marathwada mukti sangram din mahiti, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन माहिती

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇







Post a Comment

0 Comments