आयझॅक न्यूटन माहिती मराठी | newton scientist information in marathi
▶️ नाव - आयझॅक न्यूटन
▶️ जन्म - 04 जानेवारी, 1642
▶️ देश - इंग्लंड
▶️ मृत्यू - 20 मार्च, 1727
या शास्त्रज्ञाचे नाव घेतले कि डोळ्यासमोर येते सफरचंदाचे झाड कारण सफरचंदाच्या झाडाने गुरूत्वाकर्षनाचा शोध लावण्याची प्रेरणा न्युटन यांना दिली आणि म्हणूनच त्यांनी शोधून काढले कि कोणतीही वरती टाकलेली वस्तू खाली परत येते.
आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहिले.
वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होते. त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्यांचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसले होते. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकना वाटले, आपण वाऱ्याचा वेग मोजावा. त्यांच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वाऱ्याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वाऱ्याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्यांचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रिजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी विचारले, "हे तू काय करतोस?" आयझॅक म्हणाले, "मी वाऱ्याचा वेग मोजतो आहे". या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब व एक इंच रुंद असलेली दुर्बीण तयार केली.
पृथ्वीवरून आकाशाच्या दिशेने भिरकावल्या गेलेल्या वस्तूचा वेग वाढवत जाऊन दर सेकंदाला ११.२ किलोमीटर केला असता तर ती वस्तू पृथ्वीपासून दूरच जात राहील आणि ती कधीच परत येणार नाही, असा निष्कर्ष न्यूटनने काढला होता.
गुरुत्वाकषणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17वया शतकात लावला पृथ्वीचे गुरुत्वीय बरं हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तू चया च्या विरुद्ध दिशेने असते त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शुन्य होते. मग ती वस्तु आणखी.वर न जाता खाली पडायला लागते.खाली पडताना तिच्या. गतीत गुरुत्वीय बलामुळेच सतत वाढ होत जाते.
🔰 न्यूटनचे गतीविषयक तीन नियम पहा.👇
1) पहिला नियम/newtons first law :-
कुठल्याही शरीरावर बाह्य अस्थिर बल जोपर्यंत क्रिया करत नाही तोपर्यंत ते शरीर एक सरळ रेषा किंवा समान गतीत कार्यरत राहते. ह्याला जडत्वाचा नियमही म्हणतात.
2) दुसरा नियम/Newton SECOND law:- संवेगाचे परिवर्तनाचा दर हा प्रयुक्तबदलाशी समानुपती असून संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होतो.
F=ma
3) तिसरा नियम/Newton Third law:-
प्रत्येक क्रियेला समान , विरुद्ध व समकालीन प्रतिक्रिया असते .
वाचा👉 मा.विभागीय आयुक्त शालेय उपक्रम यादी
हे पण वाचा 👉शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध
हे पण वाचा 👉ऑलिम्पिक विजेते | olympic vijeta list
हे पण वाचा 👉 Astronomy Club | ग्रहांची नावे मराठी व इंग्रजी
येथे क्लिक करा.▶️ शिक्षक बदली वेबसाईट
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

0 Comments