शालार्थ पासवर्ड रिसेट कसा करावा |शालार्थ पे स्लिप | Shalarth Pay Bill pdf
शालार्थ पे बिल कसे पहावे |
Shalarth Employee Login चा पासवर्ड विसरल्यास रिसेट कसा करावा? |
How to reset Shalarth Employee Login Password.👇
शालार्थ मध्ये Employee लॉगिन च्या मदतीने आपण आपले पगार पत्रक स्वतः PDF स्वरुपात डाउनलोड करु शकतो. परंतु जर आपला पासवर्ड काही कारणास्तव विसरला तर ते शक्य होत नाही. आपला Employee Login चा पासवर्ड रिसेट कसा करावा याबाबत आज आपण माहीती पाहणार आहोत.?
✳️ आज आपण आपल्या लेखामध्ये शालार्थ Employee Login चा पासवर्ड कसा रिसेट करावा याबाबत माहीती पाहणार आहोत.
Employee Login चा पासवर्ड विसरल्यास तो रिसेट करण्याची सुविधा Employee Login ला दिलेली नाही. सदर पासवर्ड रिसेट करावयाचा असल्यास त्यासाठी Head Master Login म्हणजेच DDO-1 लॉगीनचा वापर करावा लागेल. खालील प्रमाणे कृती करुन आपण पासवर्ड रिसेट करु शकता.
➡️ 1) प्रथमतः आपण https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp या शालार्थ च्या वेबसाईटला भेट द्या,
नंतर तुमच्यासमोर दिसणार्या Pop up Window मध्ये Always allow करा.
➡️ 2) तुम्ही शालार्थ च्या लॉगीन पेजवर आलेले असाल. लॉग इन पेजवर DDO1 यांचा User ID आणि password वापरुन लॉगीन करा.
➡️ 3) तुम्ही लॉगीन झालेले असाल. लॉग इन केल्यानंतर आपणास वरच्या पट्टीत शाळा आणि मुख्याध्यापक यांची माहीती दिसेल. आणि त्याखाली Work list आणि Report असे दोन टॅब दिसतील. त्यापैकी Work list या टॅबवर क्लिक करा.
➡️ 4) त्यावर क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी Reset Employee Password असा टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा.
➡️ 5) आपणास Employee Details नावाची विंडो दिसेल. User Name च्या समोर आपणास ज्या कर्मच्यार्याचा पासवर्ड रिसेट करायचा आहे. त्या कर्मच्यार्याचा शालार्थ आयडी टाकुन बाजुला क्लिक करा. आपल्याला सदर कर्मच्यार्याचे नाव व DDO कोड दिसेल. योग्य कर्मचारी निवडल्याची खात्री करा आणि Update Password या बटनावर क्लिक करा.
➡️ 6) त्यानंतर आपल्यासमोर आपला शालार्थ आयडी म्हणजेच आपला User ID आणि आपला By Default Password दिसेल. आपला पासवर्ड रिसेट करण्याची प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. आता आपण आपल्या By Default Password ने LOG IN करु शकता.
✳️ आपणास हे ही आवडेल नक्की वाचा.👉शालार्थ पगार बिल कसे डाऊनलोड करावे.
✳️ शालार्थ पगार बिल कसे पहावे, मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇
✳️ शालार्थ पगार बिल कसे असते ते समजून घेऊया.एकूण भत्ते व शासकीय वजावटी.👇
आपणास हे ही आवडेल नक्की वाचा.➡️ SGSP खात्याचे प्रकार व फायदे
Subscribe Channel.👇👇
https://youtube.com/c/Teacher4U
1 Comments
Sir user name or password invalied
ReplyDeleteSangat aahe aani ddo coad mahit nahi mg