माझा आवडता संशोधक निबंध | Maza Avadata Sanshodhak
जगामध्ये हजारो शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या प्रगतीमध्ये मोलाची भर टाकली आहे. त्यापैकी मला डॉक्टर C.V.Raman हे नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ खूप आवडतात.आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जगद्विख्यात वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तिरुचिरापल्ली येथे झाला. मद्रास रेसिडेन्सी कॉलेज या मान्यवर महाविद्यालयात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झालं. ते विज्ञान शाखेची पदवी प्राप्त करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. भौतिकशास्त्र या विषयामध्ये त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले. सी व्ही रामन यांनी भौतिकशास्त्राची पदवी प्राप्त केली. विद्यार्थिदशेत असतानाच प्रकाश आणि ध्वनी या विषयांमध्ये संशोधन करून प्रावीण्य मिळवले. C.V.Raman हे भारत पारतंत्र्याच्या काळात असताना वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर भरीव कामगिरी करून नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते.
सी.व्ही.रामन ज्या काळामध्ये भारतामध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कामगिरी बजावत होते, त्या काळामध्ये भारतात विज्ञान क्षेत्राला चांगले दिवस नव्हते. भारत देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता देशामध्ये विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्यासाठी अनुकूल परिस्थिती नव्हती. संशोधनाला फारसे महत्त्व आणि प्रोत्साहन नसल्यामुळे तर रामन यांनी भारत सरकारच्या त्यावेळच्या अर्थ खात्यात नोकरी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला होता.
✳️ संशोधन :-
अर्थ खात्यात नोकरी करत असताना रामन यांनी कलकत्त्यातील इंडियन असोसिएशन फोर कल्टिवेशन ऑफ सायन्स वैज्ञानिक संशोधन कार्याला उत्तेजन देणार्या संस्थेमध्ये आपले संशोधनाचे काम चालू ठेवले. कलकत्ता विद्यापीठाने या तरुण शास्त्रज्ञाचे गुण ओळखून १९१७ मध्ये त्यांची या केंद्रात नेमणूक करण्यात आली.१७-१८ वर्ष त्यांनी या विद्यापीठात काम केले. त्यानंतर १९३३ मध्ये बंगलोर मधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेमध्ये भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली.१९३३ ते १९४८ अशी पंधरा वर्ष बंगलोर मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत त्यांनी संशोधनाचे कार्य केले.१९४८ यावर्षी स्वतःची रामण इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ही संस्था रामन यांनी स्थापन करून त्या संस्थेचे ते संचालक झाले.
सी व्ही रामन यांना प्रथमपासूनच प्रकाशाबरोबरच ध्वनी आणि ध्वनीमधून येणारी कंपन याविषयी खास आकर्षण होतं. त्यामुळे त्यांनी अर्थ खात्यातल्या नोकरीत असतानाही तंतूंच्या आंदोलनांच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक गोष्टी हा आपला अभ्यासाचा विषय केलेला होता. त्यामुळे व्हायोलीन, पियानो, विणा,सतार, मृदंग, तबला अशा विविध प्रकारच्या वाद्यांमधून होणाऱ्या कंपन्यांच्या आधारे त्यांनी ध्वनी कंपनाविषयीच्या अनेक सैद्धांतिक गोष्टी विज्ञानामध्ये सिद्ध केल्या. या गोष्टींचा सामान्य तसेच सामान्य मंडळींना सुद्धा विविध प्रकारच्या वाद्यांचा वापर करताना उपयोग झाला. एखाद्या शास्त्रज्ञाला वाद्यांची आवड असावी संगीतामध्ये त्यांनी रुची घ्यावी हे थोडे अनाकलनीय वाटेल. परंतु खरा शास्त्रज्ञ हा प्रत्येक गोष्टीमध्ये असलेलं विज्ञान शोधण्यात आणि सिद्ध करण्यामध्ये रमलेला असतो हेच यातून दिसून येईल.
✳️ विविध पुरस्कार :-
इसवी सन 1921 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झालेला नव्हता त्यापूर्वी 25 26 वर्ष त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादांमध्ये भाग घेताना कोलकत्ता विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून काम केले. सी. व्ही. रमण यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने विविध प्रकारचे द्रवपदार्थ घेऊन द्रव व वायू यांच्या वापराने कंपनात पडणाऱ्या फरक याविषयीचे तसेच प्रकाशाच्या विखूरण्याविषयीचे अनेक प्रयोग केले आणि भौतिक विज्ञानामध्ये खरोखरच मूलभूत संशोधन महत्त्वाचं आहे हे सिद्ध केलं.सी. व्ही.रामन यांनी जवळजवळ 500 पेक्षा जास्त संशोधन निबंध लिहून भारताची मान उंचावली. लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल 1924 यावर्षी संस्थेचे सन्माननीय सभासदत्व बहाल केलं होतं. 1929 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना नाईट हा किताब बहाल केला. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले रामन हे जगामध्ये एक श्रेष्ठ दर्जाचे वैज्ञानिक आहेत हे जाणून स्वतंत्र भारताच्या सरकारने 1954 मध्ये सी. व्ही. रामन यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला.
✳️ नोबेल पारितोषिक कधी व कसे मिळाले :-
“प्रकाशाच्या विखुरण्यावरील त्याच्या कार्यासाठी आणि त्याच्या नावाच्या प्रभावाच्या शोधासाठी.” या संशोधनासाठी सी. व्ही. रामन यांना नोबेल पारितोषिक दिले गेले. या संशोधनाला रामन परिणाम Raman Effect असे म्हटले जाते.जेव्हा प्रकाश प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा लहान कणांना भेटतो तेव्हा प्रकाश वेगवेगळ्या दिशेने पसरतो. हे घडते, उदाहरणार्थ, जेव्हा प्रकाश पॅकेट – फोटॉन – गॅसमध्ये रेणूंचा सामना करतात. 1928 मध्ये वेंकट रामन यांनी शोधून काढले की विखुरलेल्या प्रकाशाचा एक छोटासा भाग मूळ प्रकाशापेक्षा इतर तरंगलांबी प्राप्त करतो. याचे कारण असे की येणार्या फोटॉनची काही ऊर्जा रेणूमध्ये हस्तांतरित केली जाऊ शकते, ज्यामुळे त्याला उच्च पातळीची ऊर्जा मिळते. इतर गोष्टींबरोबरच, इंद्रियगोचर विविध प्रकारच्या सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जाते.
रामन परिणाम हे अतिशय मौलिक संशोधन आहे. 1930च्या वर्षात भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक डॉक्टर सी व्ही रामन या भारतीय शास्त्रज्ञाला मिळाले.तेव्हा जगभरातील विज्ञान क्षेत्र अचंबित झाले भारतासारख्या वैज्ञानिकदृष्ट्या मागासलेल्या आणि पारतंत्र्यात असलेल्या देशातल्या वैज्ञानिकाला नोबेल मिळते ही एक प्रथमच घडणारी घटना होती. या नोबेल पारितोषिकाने पारतंत्र्यात असलेल्या भारतमातेची मान एका अनोख्या पुरस्काराने उंचावली गेली.संपूर्ण भारतवर्ष या घटनेसाठी सी.व्ही.रमण यांचा निश्चितच ऋणी असेल.
एखादा माणूस एखाद्या क्षेत्रात स्वतःला झोकून देतो, तेव्हा तो किती मोठे काम करू शकतो, किती उंची गाठू शकतो हे चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या उदाहरणाने आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत साधी राहणी, कमीत कमी गरजा, सारे लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रित करणं, संशोधन हा एकच ध्यास त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवत स्वतः शिकत राहणे आणि आपल्या अभ्यास विषयात रममाण असणे, आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये सहभागी होऊन निरनिराळ्या निबंध सातत्याने सादर करीत राहणे या सर्व बहुतेक गोष्टी सर सी व्ही रामन यांच्या वैयक्तिक जीवनात असल्यामुळे त्यांचे जीवन हे विलक्षण वेगळे होते.
सी. व्ही. रामन हे अतिशय बुद्धिमान शास्त्रज्ञ होते. भारतामध्ये विज्ञान क्षेत्राला अनुकूल वातावरण नसतानाही त्यांनी भारतात राहूनच संशोधन केले हे विशेष आहे.पाश्चात्य देशांमध्ये जर सी व्ही रामन जन्माला आले असते तर त्यांनी जे संशोधन केले त्याच्या कितीतरी अधिक संशोधन यांच्याकडून झाले असते. त्या ठिकाणी त्या काळामध्ये त्यांना विज्ञान संशोधनाला पुरेसे अनुकूल वातावरण मिळाले असते परंतु सी.व्ही.रामन सारखे शास्त्रज्ञ अनुकूल परिस्थितीची वाट पाहणारे नसतात. प्रतिकूल परिस्थितीलाही ते अनुकूल बनवण्यासाठी संघर्ष करून आपले काम पुढे नेत असतात आणि जगाच्या नकाशावर आपल्या कार्याने कायमची छाप सोडत असतात.
0 Comments