kendrastar sakhi savitri samiti rachna v karye | केंद्रस्तर सखी सावित्री समिती रचना व कार्ये
सखी सावित्री समिती |
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करणेबाबत.
शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
जी.आर. सांकेतांक क्र. 202203101103220221
दि. 10-03-2022
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125 व्या स्मृतीदिना निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी सखी सावित्री समिती तयार करण्यात आली आहे.
केंद्रस्तर सखी सावित्री समिती खालीलप्रमाणे : 👇
अ.क्र. पदनाम :- पद
१. केंद्रप्रमुख :- अध्यक्ष
२. केंद्रातील महिला शिक्षक प्रतिनिधी :- सदस्य
३. समुपदेशक :- सदस्य
४. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला प्रतिनिधी) :- सदस्य
५. अंगणवाडी पर्यवेक्षिका :- सदस्य
६. विधीज्ञ :- सदस्य
७. बालरक्षक (महिला प्रतिनिधी) व केंद्रातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी :- सदस्य
८. नजीकच्या पोलिस स्टेशन मधील महिला पोलिस प्रतिनिधी :- सदस्य
९. केंद्र शाळेचे मुख्याध्यापक :- सदस्य सचिव
केंद्रस्तर सखी सावित्री समितीची कार्ये : 👇
१) केंद्रस्तर समितीची दर दोन महिन्यातून एक (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा) बैठका केंद्रशाळेत आयोजित कराव्यात.
(२) आपल्या कार्यक्षेत्रातील मुला-मुलींची १००% पटनोंदणी, १०० टक्के उपस्थिती, तसेच शाळाबाह्य व स्थलांतरीत पालकांच्या मुला-मुलींचे १०० टक्के समायोजनासाठी शाळास्तर समितीला मार्गदर्शन करणे व कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणे..
३) मुला-मुलींना करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकसन, मुलींसाठी स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण व कार्यक्षेत्रातील बालविवाह बंद करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शाळास्तर समितीला मार्गदर्शन करणे, व यासंबंधीचा अहवाल तालुकास्तर समितीकडे सादर करुन योग्य कार्यवाहीसाठी प्रयत्न करणे तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा ( POCSO) अंतर्गत असलेल्या ई-बॉक्स व CHIRAG या Appबाबत जागृती करणे.
४) शाळास्तरावर राबविण्यात येणाऱ्या सर्व उपयोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी शाळास्तर समितीवर नियंत्रण ठेवणे. केंद्रातील कोणत्याही शाळेने या उपयोजनांची अंमलबजावणी योग्यरित्या केल्यास त्यांच्या प्रयत्नांना प्रसिद्धी व प्रोत्साहन देणे.
५) केंद्रस्तर समितीने कार्याचा अहवाल तालुकास्तर समितीच्या प्रत्येक ३ महिन्याच्या बैठकीत सादर करावा, जेणेकरून केंद्रातील कोणत्याही स्तरावर निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान करण्यासाठी तालुकास्तर समितीला तातडीने निर्णय घेणे शक्य होईल.
६) शाळास्तर समिती व तालुकास्तर समिती यांच्यामध्ये समन्वयाचे कामकाज करणे.
७) सदर समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेताक २०२२०३१०११०३२२०२२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(इम्तियाज काझी)
सह सचिव, महाराष्ट्र शासन
शासन परिपत्रक पाहा 👇
आपणास हे ही वाचायला आवडेल ➡️ शाळास्तर सखी सावित्री समितीची रचना व समितीचे कार्य
आपणास हे ही वाचायला आवडेल ➡️ तालुकास्तर सखी सावित्री समितीची रचना व समितीचे कार्य
✳️ हे पण आवडेल वाचा - आयकर आकारणीची पद्धत मिळणारी एकुण वजावट
✳️ हे पण आवडेल वाचा - आयकर विवरण पत्र 2021-22 साठी वार्षिक पगारपत्रक Excel sheet व Pdf
✳️ हे पण आवडेल वाचा - Income tax calculator
0 Comments