Subscribe Us

talukastar sakhi savitri samiti rachna v karye | तालुकास्तर सखी सावित्री समिती रचना व कार्ये

talukastar sakhi savitri samiti rachna v karye | तालुकास्तर सखी सावित्री समिती रचना व कार्ये


talukastar sakhi savitri samiti
talukastar sakhi savitri samiti

तालुकास्तर सखी सावित्री समिती रचना व कार्ये

talukastar sakhi savitri samiti rachna v karye 

राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करणेबाबत.

शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

जी.आर. सांकेतांक क्र. 202203101103220221

दि. 10-03-2022

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125 व्या स्मृतीदिना निमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी सखी सावित्री समिती तयार करण्यात आली आहे.


तालुका / शहर साधन केंद्रस्तर सखी सावित्री समिती : 👇

अ.क्र. पदनाम :- पद

१. गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी :-  अध्यक्ष

२. तालुका/शहर साधन केंद्र संपर्क अधिकारी (डायट)  :- सदस्य

३. विधीज्ञ (महिला प्रतिनिधी)  :- सदस्य

४. पंचायत समिती सदस्य (महिला प्रतिनिधी)  :- सदस्य

५. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला प्रतिनिधी) :- सदस्य 

६. तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी  :- सदस्य

७. पोलीस निरीक्षक /पोलीस उपनिरीक्षक   :- सदस्य

८. बालरक्षक (महिला प्रतिनिधी) व तालुक्यातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी  :- सदस्य

९. स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी  :- सदस्य

१०. समुपदेशक विस्तार अधिकारी (महिला असल्यास प्राधान्य)  :- सदस्य सचिव


तालुका / शहर साधन केंद्र सखी सावित्री समितीची कार्ये : 👇

१) तालुकास्तर समितीची दर तीन महिन्यातून एक (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा) बैठका गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित करणे.

२) शाळा व केंद्र स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी केंद्रस्तर समिती व शाळास्तर समितीवर नियंत्रण ठेवणे.

३) व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) च्या माध्यमातून सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत करणेसाठी कार्यक्षेत्रातील कंपन्यांशी संपर्क साधून मदत उपलब्ध करून घेणे. उपलब्ध मदत पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करणे.

४) शाळास्तरावर व केंद्रस्तरावर निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान व तक्रारींचे निवारण करण्यासाठी थेट तालुकास्तर समितीकडे तक्रार सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे. 

५) मुला-मुलींच्या बालहक्क संरक्षणासाठी व समितीमार्फत शाळा व केंद्र स्तरावर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना प्रोत्साहन व प्रसिध्दी देणे.

६) तालुकास्तर समितीच्या कार्याचा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सादर करावा, जेणेकरून जिल्हयातील कोणत्याही स्तरावर मुलामुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल.

७) सदर समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेताक २०२२०३१०११०३२२०२२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(इम्तियाज काझी)

सह सचिव, महाराष्ट्र शासन


शासन परिपत्रक पाहा 👇


आपणास हे ही वाचायला आवडेल ➡️ केंद्रस्तर सखी सावित्री समितीची रचना व समितीचे कार्य

आपणास हे ही वाचायला आवडेल ➡️ शाळास्तर सखी सावित्री समितीची रचना व समितीचे कार्य

✳️ हे पण आवडेल वाचा - आयकर आकारणीची पद्धत मिळणारी एकुण वजावट

✳️ हे पण आवडेल वाचा - आयकर विवरण पत्र 2021-22 साठी वार्षिक पगारपत्रक Excel sheet व Pdf

✳️ हे पण आवडेल वाचा - Income tax calculator


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

 









Post a Comment

0 Comments