Subscribe Us

शाळा सिद्धी 2023 24 माहिती कशी भरावी

शाळा सिद्धी 2023 24 माहिती कशी भरावी 

शाळा सिद्धी माहिती
शाळा सिद्धी माहिती


शाळा सिद्धी सर्व माहिती

Shaala Siddhi 2021-2022 All Information Maharashtra

शाळेची माहिती शाळा सिद्धि माहिती भरण्याकरिता वेबसाईट सुरू झालेली आहे.

जिल्ह्यातील 100% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा,नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धि वेब पोर्टल वर करणे आवश्यक आहे.


✳️ शाळा सिद्धि वेबसाईट.👇👇
https://shaalasiddhi.niepa.ac.in/shaalasiddhi/Account/ShaalaSiddhiLogin


💥 शाळेची शाळा सिद्धी माहिती भरताना काही आवश्यक सूचना

प्रमुख क्षेत्र १ :- शाळेचे सामर्थ्य स्त्रोत: उपलब्धता, पर्याप्तता

स्तर १. प्रत्येकी ➔  एक गुण ( 12 गुण)

स्तर २. प्रत्येकी ➔ दोन गुण (24गुण)

स्तर ३. प्रत्येकी ➔  तीन गुण (36गुण)

➧ एकूण गुण  ➔  36 

➧ गाभा मानके 👇

➤ शालेय परिसर

➤ क्रीडांगण आणि क्रीडा साधने साहित्यासह

➤ वर्गखोल्या आणि इतर खोल्या

➤ विद्युत आणि विद्युत उपकरणे

➤ ग्रंथालय

➤ प्रयोगशाळा

➤ संगणक (जेथे तरतूद उपलब्ध आहे.)

➤ उतार रस्ता (Ramp)

➤ मध्यान्ह भोजन

➤ उपलब्ध स्वयंपाकगृह आणि भांडी

➤ पेयजल

➤ हात धुण्याची सुविधा

➤ स्वच्छतागृहे

प्रमुख क्षेत्र २ अध्यापन अध्ययन आणि मुल्यांकन

स्तर- १. प्रत्येकी ➔  एक गुण ( 9 गुण)

स्तर २. प्रत्येकी ➔  दोन गुण (18गुण)

स्तर ३. प्रत्येकी ➔  तीन गुण (27 गुण)

➧ एकूण गुण ➔  27

➧ गाभा मानके 👇

➤ शिक्षकांना विध्यार्थ्यांविषयी असलेली जाणीव

➤ शिक्षकांचे विषयज्ञान व अध्यापन कौशल्याचे ज्ञान

➤ अध्यापनाचे नियोजन

➤ अध्ययन पोषक वातावरण निर्मिती

➤ वर्ग व्यवस्थापन

➤ विद्यार्थी मुल्यांकन

➤ अध्यापन अध्ययन संसाधनांचा वापर

➤ शिक्षकांचे स्वतःच्या अध्यापन - अध्ययन प्रक्रियेबाबत चिंतन / विचार

प्रमुख क्षेत्र ३ - विद्यार्थ्यांची प्रगती, संपादणूक आणि विकास

स्तर - १. प्रत्येकी ➔  एक गुण ( 5 गुण)

स्तर -२. प्रत्येकी ➔  दोन गुण (10 गुण)

स्तर -३. प्रत्येकी ➔  तीन गुण (15गुण)

➧ एकूण गुण ➔ 15 

➧ गाभा मानके 👇

➤ विद्यार्थी उपस्थिती

➤ विद्यार्थी सहभाग आणि कार्यप्रवणता

➤ विद्यार्थी प्रगती

➤ विध्यार्थ्याचा वैयक्तिक आणि सामाजिक विकास

➤ विद्यार्थी संपादणूक

प्रमुख क्षेत्र ४ - शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन

स्तर १. प्रत्येकी ➔  एक गुण ( 6 गुण)

स्तर - २. प्रत्येकी ➔  दोन गुण ( 12 गुण)

स्तर - ३. प्रत्येकी ➔  तीन गुण (18गुण)

➧ एकूण गुण ➔  18 

➧ गाभा मानके 👇

➤ नवीन शिक्षकांचे उद् बोधन

➤ शिक्षक उपस्थिती

➤ नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कामगिरी ध्येये स्पष्ट करणे

➤ शिक्षकांच्या कामगिरीची देखरेख

➤ शिक्षकांची व्यावसायिक प्रगती

प्रमुख क्षेत्र ५ - शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन

स्तर - १. प्रत्येकी ➔  एक गुण ( 4 गुण)

स्तर -२. प्रत्येकी ➔  दोन गुण ( 8 गुण)

स्तर ३. प्रत्येकी ➔  तीन गुण (12गुण)

➧ एकूण गुण  ➔ 12 

➧ गाभा मानके 👇

➤ दृष्टी निर्मिती व दिशा निश्चितीकरण

➤ बदलांचे व सुधारणांचे नेतृत्व

➤ अध्ययन व अध्यापनाचे नेतृत्व

➤ शालेय व्यवस्थापनाचे नेतृत्व

प्रमुख क्षेत्र ६ - समावेशान, आरोग्य आणि संरक्षण

स्तर १. प्रत्येकी ➔  एक गुण ( 5 गुण)

स्तर - २. प्रत्येकी ➔  दोन गुण (10 गुण)

स्तर ३. प्रत्येकी ➔  तीन गुण (15गुण)

➧ एकूण गुण  ➔ 15 

➧ गाभा मानके 👇

➤ समावेशित संस्कृती

➤ गरजाधिष्ठित बालकांचे समावेशन

➤ शारीरिक सुरक्षा

➤ मानसिक सुरक्षा

➤ आरोग्य आणि स्वच्छता

प्रमुख क्षेत्र ७ - उत्पादक समाजाचा सहभाग

स्तर १. प्रत्येकी ➔ एक गुण ( 5 गुण )

स्तर २. प्रत्येकी ➔ दोन गुण (10 गुण )

स्तर ३. प्रत्येकी ➔ तीन गुण (15 गुण )

➧ एकूण गुण ➔ 15 

➧ गाभा मानके 👇

➤ शाळा व्यवस्थापन समिती/ शाळा विकास व्यवस्थापन समितीचे संघटन आणि व्यवस्थापन

➤ शाळा विकासामधील भूमिका

➤ शाळा - समाज संधान

➤ समाज एक अध्ययन स्त्रोत 

➤ समाज सबलीकरण

💥 प्राप्त झालेले गुण व श्रेणी 👇

➔ ११२ ते १३८ गुण :- अ श्रेणी

➔ ६९ ते १११ गुण :- ब श्रेणी

➔ ६८ किंवा त्यापेक्षा कमी गुण :- क श्रेणी

आपणास हे ही वाचायला आवडेल ➡️ शाळा सिध्दी श्रेणी कशी काढावी

शाळासिद्धि कार्यक्रमांतर्गत शाळाचे सन 2021-22 चे स्वयंमूल्यमापन पूर्ण करणे बाबत...

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता आश्वासीत करणे महत्त्वाचे असून शैक्षणिक,भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरून शाळासिद्धी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 100% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा, नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धि वेब पोर्टल वर करणे आवश्यक आहे. त्यानुसार दरवर्षी राज्यातील 100शाळांचे स्वयंमूल्यमापन करावयाचे आहे.

यादृष्टीने आपल्या स्तरावरून सर्व शाळांना पुढील सूचना देण्यात याव्यात. शाळासिद्धी कार्यक्रमासाठी निपा, नवी दिल्ली यांच्या www.shalasiddhi.niepa.ac.in पोर्टल वरील सन 2021-22 च्या शाळांच्या स्वयंमूल्यमापनाची टॅब सुरू झाली आहे.

• सर्व शाळांनी या आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापने पूर्ण करून त्याची माहिती दिनांक 30 एप्रिल 2022 पर्यंत शाळासिद्धि वेब पोर्टलवर भरावयाची आहे.

शाळासिद्धी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती या वेब पोर्टलवर आहे.

वेबपोर्टल चा वापर कसा करावा यासाठी वेबपोर्टलवर माहिती (userimantual) देण्यात आली आहे.

• मराठी माध्यमाची शाळासिद्धी पुस्तिका देखील वेबपोर्टलवर उपलब्ध आहे.

• दिनांक 25 मार्च 2019 रोजी झालेले शाळासिद्धि स्वयंमूल्यमापन वेबिनार या यूट्यूब च्या लिंक वर उपलब्ध आहे.

• सर्व शाळांनी सन 2021-22 मधील स्वयंमूल्यमापन सदर वेबिनार मधील निपा, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांनुसार पूर्ण करावे

• स्वयंमूल्यमापन करताना मुख्याध्यापकांनी शाळासिद्धीची स्वतंत्र संचिका करून त्यात युजरनेम आणि पासवर्ड स्वतःच्या ताब्यात ठेवावे.

• मुख्याध्यापकांची बदली झाल्यास कार्यभार हस्तांतरणाच्या वेळी सदर संचिका पुढील मुख्याध्यापकांकडे हस्तांतरित करावी. 

• सन 2020-21चे स्वयंमूल्यमापन पूर्ण केलेल्या शाळांनी त्यांची हार्ड कॉपी सदर संचिकेत लावावी असे दरवर्षी करावे.

(काहीही अडचण आल्यास शाळासिद्धी संपर्क अधिकारी व तालुका अधिकारी यांच्याशी संपर्क करावा)

शाळासिद्धी संपूर्ण कार्यक्रम हा online आहे. यासाठी शाळासिद्धीचे राष्ट्रीय पोर्टल आहे.

आपल्याला या कार्यक्रमाचे संपूर्ण मार्गदर्शन या पोर्टलवर दिलेले आहे.

सुरुवातीला सन 2014-15 साली असलेला udise data या कार्यक्रमासाठी वापरण्यात आला.

त्यामुळे 2014-15 मध्ये udise प्राप्त शाळांचा समावेश या कार्यक्रमात झाला. इतर शाळांचा सहभाग नाही.

शाळासिध्दी हा विभाग Udise या विभागाकडून माहिती घेते.

Udise केंद्र शासन आणि NCERT चा स्वतंत्र विभाग आहे.

आता राहिला प्रश्न नवीन शाळांना add करण्याचा

उत्तर- ज्या शाळा शाळासिद्धी पोर्टलला add नाहीत त्यांनी शाळासिध्दी ऑफलाईन रेकॉर्ड ठेवावे.

Forget Password सुविधा

ज्या शाळांना, मुख्याध्यापकांना शाळासिद्धी login साठी password आठवत नाही त्यांनी याठिकाणी असलेल्या forget password या option चा वापर करावा. Registered मोबाईल नंबरवर OTP येतो. नंतर हवा तो पासवर्ड बदलून घ्यावा.

मुख्याध्यापक मोबाईल नंबरवर otp येत नसल्यास केंद्रप्रमुख login open करावे. केंद्रातील सर्व शाळांचे otp दिसतात. 

 केंद्रप्रमुख login create करावे.

ज्या पध्दतीने सरल पोर्टल वर केंद्रप्रमुख login आहे

अगदी तसेच login शाळासिद्धी मध्ये आहे

आपली प्रत्येक समस्या केंद्रस्तरावरच केंद्रप्रमुख सोडवू शकतात.


✳️ शाळा सिद्धि वेबसाईट.👇👇
https://shaalasiddhi.niepa.ac.in/shaalasiddhi/Account/ShaalaSiddhiLogin

शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orientation Programme च्या वेबिनारचे आयोजन करणेबाबत करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार सदर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दि. २३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आले होते. 

शाळा सिद्धी ऑनलाईन वेबिनार पहा.👇


आपणास हे ही वाचायला आवडेल ➡️ शाळा सिध्दी श्रेणी कशी काढावी


❇️ शाळा सिध्दी माहिती भरण्यासाठी कोरी नमुना PDF डाऊनलोड करण्यासाठी लिंक ⬇️



व्हिडीओ पाहाण्यासाठी YOUTUBE नावाला टच करा ⬇️



✳️ हे पण आवडेल वाचा ➡️ जागतिक महिला दिनाची माहिती

✳️ हे पण आवडेल वाचा ➡️ जागतिक महिला दिन भाषण मराठी

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.


Post a Comment

1 Comments

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete