Subscribe Us

जागतिक लोकसंख्या दिन माहिती | jagtik loksankhya vadh mahiti

जागतिक लोकसंख्या दिन माहिती | jagtik loksankhya vadh mahiti

जागतिक लोकसंख्या दिन माहिती

कसा सुरु झाला जागतिक लोकसंख्या दिन हा दिवस ?

११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. त्या निमित्ताने संयुक्त राष्ट्राने याची दखल घेऊन १९८९ सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने डिसेंबर १९९० च्या ४५/२१६ च्या ठरावानुसार जास्त लोकसंख्येच्या परिणामाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला गेला. १९९० मध्ये हा दिवस ९० देशांनी साजरा केला.

जागतिक लोकसंख्या दिन जगभरात ११ जुलै रोजी साजरा करण्यात येतो. सध्या जगाची लोकसंख्या ही ७.७ अब्ज इतकी असून २०३० मध्ये ती ८.५ अब्ज तर २०५० मध्ये ती ९.७ अब्ज इतकी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक लोकसंख्या १०.९ अब्जचा टप्पा पार होईल असा अंदाज आहे. लोकसंख्या ही त्या- त्या देशाची ताकद असते असं म्हटलं जातं. लोकसंख्येचा आकार किती आहे याचा परिणाम एखाद्या देशाच्या विकासावरही होतो. आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांच्या विकासाला वाढत्या लोकसंख्येमुळे आळा बसल्याचाही दावा केला जातो. आपले भविष्य वाचवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात राहणे अतिशय गरजेचं आहे. यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवं.

जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची उद्दिष्टे

  1. मुले आणि मुलींचे (दोन्ही लिंगांच्या) तरुणाईचे समान संरक्षण करणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे.
  2. तरुण-तरुणींना आपल्या जबाबदार्‍या समजून घेण्याची क्षमता येईपर्यंत त्यांना लैंगिकता आणि उशिरा लग्न करण्यासंबंधीची तपशीलवार माहिती देणे.
  3. संततीनियमनविषयक योग्य साधने वापरून आणि उपाययोजना योजून अनैच्छिक गर्भारपण टाळण्यासाठी तरुणाईला शिक्षित करणे.
  4. समाजातून लिंगनिहाय तेच ते (स्टिरिओटाईप) दृष्टिकोन हद्दपार करण्यासाठी लोकांना शिक्षित करणे.
  5. कमी वयातील प्रसूतीच्या धोक्यांविषयी जागृती करण्यासाठी गर्भारपणाशी संबंधित आजारांविषयी शिक्षित करणे.
  6. लैंगिक संबंधातून संक्रमित होणार्‍या आजारांविषयी शिक्षित करणे.
  7. मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी कायदे करण्याची आणि धोरणे आखण्याची मागणी करणे.
  8. मुलांना आणि मुलींना समान प्राथमिक शिक्षण मिळेल याची खात्री करणे.
  9. मूलभूत प्राथमिक आरोग्याचा एक भाग म्हणून प्रत्येक जोडप्याला प्रजननविषयक आरोग्य सेवा सहजगत्या सर्वत्र उपलब्ध होतील याची खात्री करून घेणे.

का साजरा केला जातो हा दिवस ?

वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोकसंख्येच्या संबंधित विषयावर चर्चा केली जाते. तसेच काही कार्यक्रमही आयोजित केले जातात. यामध्ये कुटुंबनियोजन, गरीबी, लैंगिक समानता, मानसिक आरोग्य, नागरी अधिकार आणि इतरही विषयही असतात.

वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम

  1. बेरोजगारी – लोकसंख्या वाढल्याने लोक रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या शहरांकडे वळू लागले. नोकरीच्या संधी कमी झाल्याने बेरोजगारी वाढूही लागली. परिणामी गरिबीमध्येही झपाट्याने वाढ होऊ लागली.
  2. रोगराई – वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्याच्या सोयी देखील अपुऱ्या पडू लागल्या आहेत. साथीचे रोग मोठ्या प्रमाणात पसरू लागलेले दिसून येत आहेत.


वाचा - जागतिक लोकसंख्या दिन निबंध मराठी | jagtik loksankhya din nibandh in marathi

वाचा - जागतिक लोकसंख्या दिन कोणता | jagtik loksankhya din kadhi kartat

वाचा - jagtik loksankhya din ghoshvakye | जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य

वाचा - शाहू महाराज माहिती मराठी | shahu maharaj mahiti in marathi

वाचा - शाहू महाराज निबंध मराठी | rajarshi shahu maharaj nibandh marathi

वाचा - शाहू महाराज कार्य | shahu maharaj yanche karya



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.





Post a Comment

0 Comments