Subscribe Us

शाळा प्रवेश घोषवाक्य | ZPPS TECH GURUJI

 शाळा प्रवेश घोषवाक्य | ZPPS TECH GURUJI

शाळा प्रवेश घोषवाक्य
शाळा प्रवेश घोषवाक्य 


जिप शाळेची मुले लय भारी, 

ज्ञानरचनावादाने शिकतात सारी...!


चला शिकू या, पुढे जावू या,

जिल्हा परिषद शाळेत, प्रवेश घेऊ या..!


लहान मुलांना लावी लळा, 

जि.प.ची मराठी शाळा..!


एक दोन तिन चार,

मराठी शाळेची मुले हुशार..!


सब पढ़े सब बढे,

अज्ञान से हम लडे..!


शाळा माझी सजली रे सजली रे,

मुले खेळ गाण्यात रमली रे रमली रे...!


करु नका लेकरांच्या जीवनाचा घाटा,

मुलगा असो की मुलगी शाळेत नाव टाका..!


एक दोन तीन चार

मुला-मुलींना शिकवू छान..!


आई आई मला आता शिकू दे,

सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे...!


मुलगा मुलगी एकसमान 

दोघांनाही शिकवू छान..!


एक दोन तीन चार

जि.प.शाळा छान छान..!


चला चला शाळा झाली सुरू,

नका नका घरी आता राहू...!


सुंदर छान माझी शाळा.,

गावाचा अभिमान माझी शाळा...!


चला जाऊ शाळेला, 

नव्या गोष्टी ऐकायला..!


जि.प.शाळेची मुले न्यारी,

गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई...!


छान छान छान किती छान, 

नव्या पिढीचा मी अभिमान..!


लहान मुले देवाघरची फुले, 

अशीच माझ्या शाळेतील बाळे..!


मला जायचंय शाळेला, 

नवं काहीतरी शोधायला..!


कविता:--👇👇

उगाचच मुलांना नका धाडू कुणिकडे.

जि.प.सारखे शिक्षण नाही दुसरीकडे


करतील भरमसाट फसवुन फी गोळा

गर्दीत हरवून जाईल पोटचा गोळा

गावची शाळा  सोडून पळू नका भलतीकडे

जि.प.सारखे शिक्षण नाही दुसरीकडे


जि.प.शाळेत आहे सर्वांगीण विकास

लेखन वाचन गणित येईल झकास

पोषण आहारासंगे मोफत मिळतील कपडे

जि.प.सारखे शिक्षण नाही दुसरीकडे


खाजगीच्या वर्गात बघा तोबा गर्दी_

जि.प.चे शिक्षकच आहेत खरे दर्दी_

यांच्या इतका अनुभव नाही त्यांच्याकडे

जि.प.सारखे शिक्षण नाही दुसरीकडे


गावची शाळा आपली असते

लांबची ती लांबचीच असते

माय सोडून धावू नका उगाच मावशीकडे

जि.प.सारखे शिक्षण नाही दुसरीकडे


इंग्लिश मिडियम ला मराठीच भारी

जि.प.च्या पोरांची स्पर्धेत भरारी

कुणी होतय कलेक्टर कुणी जातय पुढे

जि.प.सारखे शिक्षण नाही दुसरीकडे


जि.प.च्या शाळा  ISO अन डिजिटल

मुलांना विकासाच्या आहेत विविध शक्कल

एक तरी ISO आहे का खाजगीकडे

जि.प.सारखे शिक्षण नाही दुसरीकडे


💐💐💐💐🏆💐💐💐💐💐

एकच मिशन ज़ि प शाळेत शिक्षण


आपली शाळा.. जि.प.शाळा

🙏🏻लक्षात ठेवा..फक्त जि.प.शाळ




वाचा -  विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ ची संपूर्ण महिती

वाचा - विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 ची संपूर्ण महिती

वाचा - विशेष संवर्ग शिक्षक भाग-3 ची संपूर्ण महिती

वाचा - जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया कार्यपध्दती टप्पा क्र. 1 ते 6

वाचा - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार अर्ज प्रक्रिया 2022


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकासाठी महत्वाची वेबसाईट.👇


Post a Comment

0 Comments