Subscribe Us

संवर्ग-३ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक | अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण महिती | जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया

संवर्ग-३ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक | अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण महिती | जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया

विशेष संवर्ग शिक्षक भाग-3
विशेष संवर्ग शिक्षक भाग-3

व्याख्या :- 👇👇

संवर्ग-३ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक :- बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.

१. अवघड क्षेत्र :- परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.👇

परिशिष्ट-१ अवघड क्षेत्राचे निकष 👇

१. नक्षलग्रस्त / पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव 
२. वार्षिक सरासरी पर्जन्यमान २००० मिलीमिटर पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव (महसूल विभागाकडील माहितीनुसार) 
३. हिंस्त्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश. ( संबंधित उप वनसंरक्षक यांच्या अहवालानुसार) 
४. वाहतूकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव / रस्त्याने न जोडलेल्या शाळा (बस, रेल्वे, इतर सार्वजनिक वाहतूक) 
५. संवाद छायेचा प्रदेश (Communication Shadow Area ) ( संबंधित महाप्रबंधक BSNL यांच्या अहवालानुसार) 
६. डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार )
७. राष्ट्रीय राज्य महामार्गापासून १० कि.मी. पेक्षा जास्त दूर.

वरील प्रमाणे जिल्हास्तरावर अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीने अवघड क्षेत्राचे दर ३ वर्षांनी (मार्च महिन्यात) पुनर्विलोकन करण्यात यावे.

1) मुख्य कार्यकारी अधिकारी - अध्यक्ष

२) उप जिल्हाधिकारी (निवडणूक) - सदस्य

3) कार्यकारी अभियंता, जि.प. बांधकाम विभाग - सदस्य

4) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग - सदस्य

5) विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ - सदस्य

6) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) - सदस्य सचिव

❇️ शिक्षक बदली-2022 प्रोफाईल अपडेट साठी वेबसाईट.👇
https://ott.mahardd.in/teacher/profile


संवर्ग-३ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक/अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण महिती व्हिडिओ पहा.👇👇



Video Credit :- Anil Kamble Sir, Nanded

४.४. टप्पा क्र. ४ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या :-

४.४.१. टप्पा क्र.३ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील. 

४.४.२. यासाठी ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची ३ वर्षांची बदली करावयाची निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र १ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

४.४.३ सदर कर्मचाऱ्याच्या बदल्या ह्या त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार करण्यात येतील.

४.४.४ सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.

४.४.५ बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.

४.४.६ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.


वाचा - जिल्हांतर्गत शिक्षक बदली 2021-22 पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून

🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ ची संपूर्ण महिती

🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 ची संपूर्ण महिती

🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ बदलीस पात्र शिक्षकांची व विस्थापित शिक्षकांची बदली

🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया कार्यपध्दती टप्पा क्र. 1 ते 6


❇️ जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली शासन निर्णयाची ठळक वैशिष्ट्ये :-

1) बदल्या Online होणार.

2) शिक्षक बदलीपात्र होण्यासाठी सर्व साधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा आणि एका शाळेवर किमान पाच वर्षे सेवा.

3) बदली अधिकार प्राप्त शिक्षकासाठी अवघड भागात किमान तीन वर्षे सेवेची अट घालण्यात आलेली आहे.

4) खो देण्याची पध्दत बंद झालेली नाही.

5) बदलीपूर्वी बदली प्रक्रिया समजण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणाचे आयोजन केले जाईल.

6) संवर्ग-1 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर संवर्ग-2 ची बदली प्रक्रिया राबविली जाईल.

7) याच प्रमाणे संवर्ग-1, संवर्ग-2, संवर्ग-3, संवर्ग-4 असा एक-एक टप्पा पूर्ण केला जाईल.

8) टप्याटप्याने फाॅर्म भरले जाणार असल्यामुळे Server वर लोड येणार नाही.

_____________________________

❇️ शिक्षकांच्या बदल्यांसाठी आवश्यक बाबी.

➡️ जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे.

➡️ जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर बदली प्रक्रियेशी संबंधित प्रशिक्षण.

➡️ शाळा निहाय रिक्त जागा घोषित करणे.

➡️ शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे.

➡️ शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे.

❇️ व्याख्या :-

➡️ अवघड क्षेत्र :- परिशिष्ट-1 मध्ये नमूद असणार्‍या 7 बाबींपैकी किमान 3 बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/ शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल.

➡️ सर्वसाधारण क्षेत्र :- वरिल अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.

➡️ बदली वर्ष :- ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.

➡️ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा  :- अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत झालेली एकूण सलग सेवा.

➡️ शिक्षक  :- या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक.

➡️ सक्षम प्राधिकारी :- शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.

➡️ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक :- बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.

_________________________

✳️ 7 एप्रिल 2021 चा शासन निर्णय पहा.👇


❇️7-एप्रिल-2021 जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली शासन निर्णय डाऊनलोड करा.⬇️👇


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.


Post a Comment

0 Comments