शिक्षक बदली 2021-22 पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून
![]() |
शिक्षक बदली 2021-22 |
💥शिक्षक बदली 2021-22
💥 प्रस्तावना :
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकाच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबतचा निर्णय शासनाने यापूर्वी संदर्भ क्र.१ व २ येथील दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये घेतलेला आहे. सदर शासन निर्णयामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक १ मे ते ३१ मे पर्यंत करण्यात याव्यात, अशी तरतुद करण्यात आलेली आहे. तथापि, सन २०१९ मधील बदली प्रक्रिया ३१ मे नंतर पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना १५ मे जुन नंतर शालेयकामी हजर व्हावे लागले. त्यामुळे सन २०१९ च्या बदली प्रक्रियेतील अतिदुर्गम डोंगराळ भागातील कार्यरत शिक्षक हे त्या पदावरील ३ वर्षांचा कालावधी दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत पूर्ण करीत नसल्यामुळे त्यांच्यावर सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदली प्रक्रियेत अन्याय होणार असल्याने, यात सुधारणा करावी, अशा स्वरुपाची निवेदने शासनाकडे प्राप्त झालेली आहेत. याकरिता उक्त दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयातील ३१ मे या ऐवजी जुन २०२२ अखेरपर्यंत परिगणना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
💥 शासन निर्णय :👇
सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर प्रमाणे पदावधीची परिगणना ही केवळ सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांसाठीच लागू असेल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०५०४१४५०१११०२० असा आहे. हा आदेश
डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय पाहा.👇
आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ ची संपूर्ण महिती
🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 ची संपूर्ण महिती
🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-3 ची संपूर्ण महिती
🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया कार्यपध्दती टप्पा क्र. 1 ते 6
0 Comments