Subscribe Us

विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ ची संपूर्ण महिती | जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया

विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ ची संपूर्ण महिती | जिल्हांतर्गत बदली  शासन निर्णय प्रक्रिया | zpps tech guruji

विशेष संवर्ग शिक्षक भाग-2
विशेष संवर्ग शिक्षक भाग-2

❇️ शिक्षक बदली-2022 प्रोफाईल अपडेट साठी वेबसाईट.👇
https://ott.mahardd.in/teacher/profile


💥 विशेष संवर्ग शिक्षक भाग - २ : 

पती-पत्नी एकत्रीकरण संपूर्ण महितीसाठी खालील विडियो पहा.👇


Video Credit:- Anil Kamble Sir, Nanded

विशेष संवर्ग शिक्षक भाग-२

पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग-२ शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)👇👇

१. पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर,

२. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर,

३. पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,

४. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका / नगरपालिका 

५. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी, 

६. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर,

टप्पा क्र.३ - विशेष संवर्ग शिक्षक भाग -२ यांच्या बदल्या :-

४.३.१ टप्पा क्र. २ प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागाची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग -२ यांच्या बदल्या करण्यात याव्यात. 

४.३.२. जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्र. ४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.

४.३.३. जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करु शकेल.

४.३.४. उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमुद केलेल्या कार्यपध्दती लागू होतील. या तरतुदीप्रमाणे संबंधिताची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक (one unit) मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण १० वर्ष सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल.

४.३.५.)   ३० कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरचे ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी रहातील. 

४.३.६. विशेष संवर्ग-२ च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.


वाचा - जिल्हांतर्गत शिक्षक बदली 2021-22 पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून

🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ ची संपूर्ण महिती

🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-3 ची संपूर्ण महिती

🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ बदलीस पात्र शिक्षकांची व विस्थापित शिक्षकांची बदली

🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया कार्यपध्दती टप्पा क्र. 1 ते 6


❇️ जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली शासन निर्णयाची ठळक वैशिष्ट्ये :-

1) बदल्या Online होणार.

2) शिक्षक बदलीपात्र होण्यासाठी सर्व साधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा आणि एका शाळेवर किमान पाच वर्षे सेवा.

3) बदली अधिकार प्राप्त शिक्षकासाठी अवघड भागात किमान तीन वर्षे सेवेची अट घालण्यात आलेली आहे.

4) खो देण्याची पध्दत बंद झालेली नाही.

5) बदलीपूर्वी बदली प्रक्रिया समजण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणाचे आयोजन केले जाईल.

6) संवर्ग-1 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर संवर्ग-2 ची बदली प्रक्रिया राबविली जाईल.

7) याच प्रमाणे संवर्ग-1, संवर्ग-2, संवर्ग-3, संवर्ग-4 असा एक-एक टप्पा पूर्ण केला जाईल.

8) टप्याटप्याने फाॅर्म भरले जाणार असल्यामुळे Server वर लोड येणार नाही.

_____________________________

❇️ शिक्षकांच्या बदल्यांसाठी आवश्यक बाबी.

➡️ जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे.

➡️ जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर बदली प्रक्रियेशी संबंधित प्रशिक्षण.

➡️ शाळा निहाय रिक्त जागा घोषित करणे.

➡️ शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे.

➡️ शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे.

____________________________

❇️ व्याख्या :-

➡️ अवघड क्षेत्र :- परिशिष्ट-1 मध्ये नमूद असणार्‍या 7 बाबींपैकी किमान 3 बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/ शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल.

➡️ सर्वसाधारण क्षेत्र :- वरिल अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.

➡️ बदली वर्ष :- ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.

➡️ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा  :- अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत झालेली एकूण सलग सेवा.

➡️ शिक्षक  :- या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक.

➡️ सक्षम प्राधिकारी :- शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.

➡️ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक :- बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.


✳️ 7 एप्रिल 2021 चा शासन निर्णय पहा.👇


_______________________________

❇️7-एप्रिल-2021 जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली शासन निर्णय डाऊनलोड करा.⬇️👇


🛑 Whatsapp वर मिळवा कोरोना लसिकरण प्रमाणपत्र.👇

🛑 युनिव्हर्सल पास काढा (Covid-19 Vaccinated).👇

✳️आपणास हे ही आवडेल ➡️ तुमच्या तिसर्‍या डोसची तारिख चेक करा

✳️आपणास हे ही आवडेल ➡️ स्वाध्याय उपक्रम आता web app वर

तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ शाळा/शिक्षक/मुख्याध्यापक उपयोगी विविध नमुना PDF व Excel फाईल्स डाऊनलोड करा.

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - भाषा

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - गणित

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - इंग्रजी

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विज्ञान

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सामाजिक शास्त्र

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कला

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कार्यानुभव

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - शारीरिक शिक्षण

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सुधारणा आवश्यक

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विशेष प्रगती आवड व छंद

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.


Post a Comment

0 Comments