सा.शा. वर्णनात्मक नोंदी | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | samajik shastra akarik nondi
आकारिक मूल्यमापन नोंदी pdf |
अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-
विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.
आकारीक तंञे.👇
१) दैनंदिन निरीक्षण
२) तोंडी काम
३) प्रात्यक्षिके
४) उपक्रम / कृती
५) प्रकल्प
६) चाचणी
७) स्वाध्याय
८) इतर
ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी :-
ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे. व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.
सामाजिक शास्त्र वर्णनात्मक नोंदी.👇
1) विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो.
2) सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.
3) नकाशा वाचन करतो.
4) नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो.
5) ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो.
6) सुचवलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो.
7) प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो.
8) प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो.
9) संविधान व प्रतिज्ञा म्हणतो.
10) समाजसुधारकाची माहिती सांगतो.
11) घटना अगदी जशीच्या तशी सांगतो.
12) प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो.
13) भौगोलिक परीस्थिती, लोकजीवन ह्यावर माहिती देतो.
14) नकाशा कुतूहलाने बघतो आणि गावांची साांगतो.
15) स्वाध्यायाची परीणामकारक उत्तरे देतो.
16) नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो.
17) पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो.
18) पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो.
19) ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो.
20) जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो.
21) नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो .
22) प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो.
23) नकाशे काढतो व भरतो.
24) नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो.
25) क्षेत्रभेटीत सहभागी होतो.
26) सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो.
27) वृक्षारोपण व संवर्धन करतो.
28) राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो.
29) ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करतो.
30) संविधानाचे महत्व सांगतो.
31) थोर नेत्याची माहिती सांगतो.
32) ऐतिहासिक घटनांचे इसवी सन सांगतो.
33) नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो.
34) पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो.
35) लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो.
36) लोकसंख्या जनजागृती करतो.
37) नकाशा वाचन करतो.
0 Comments